मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /"देवेंद्र यांचे ते विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मान्य नसेल" एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर निशाणा

"देवेंद्र यांचे ते विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मान्य नसेल" एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर निशाणा

 ओबीसींना आरक्षण मिळू नये यासाठी फडणवीसांनी जाणीवपूर्वक मराठा व ओबीसी आरक्षणाबाबत वेगवेगळी भूमिका घेतली.

ओबीसींना आरक्षण मिळू नये यासाठी फडणवीसांनी जाणीवपूर्वक मराठा व ओबीसी आरक्षणाबाबत वेगवेगळी भूमिका घेतली.

Eknath Khadse vs Devendra Fadnavis: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानावर एकनाथ खडसेंनी नाराजी व्यक्त केली आहे.

पुढे वाचा ...

जळगाव, 22 मार्च : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना जनाब बाळासाहेब असे विधान केले होते. या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत फडणवीस यांच्या वक्तव्याने अत्यंत वेदना झाल्याचं म्हटलं आहे. हिंदुत्वाचे प्रखर विचार मांडणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या लेखणीतून व वाणीतून समाज जागृत करण्याचे काम केले आहे असंही खडसे म्हणाले.

1993 साली मुंबईत उसळलेली दंगल आणि इतर घटनांच्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी धारिष्ठ दाखवले. एवढेच नाही तर या संकटामध्ये प्रतिकार करण्याची भूमिका ही बाळासाहेबांनी घेतली होती. त्याकाळी बहुतांश राष्ट्रीय संघटना या घाबरलेल्या होत्या कोणत्याही पक्षाची रस्त्यावर उतरून प्रतिकार करण्याची हिंमत त्यावेळी झाली नाही त्यावेळी बाळासाहेबांनी प्रतिकार केला मात्र एमआयएम सोबत युती झाली नसताना देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारे तात्काळ प्रतिक्रिया देणे हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

जरीही शिवसेनेसोबत एमआयएमची युती झाली असती तरी देखील अशा प्रकारे वक्तव्य करणं हे चुकीचेच असल्याचेही एकनाथ खडसे म्हणाले.

वाचा : भाजपला पराभूत करण्यासाठी एमआयएमची मोठी खेळी!

देवेंद्र फडणवीस मला वडीलधारे मानत असतील तर त्यांना सल्ला देऊन उपयोग आहे. मात्र देवेंद्र फडणवीस सातत्याने करत असलेले वक्तव्य हे नैराश्येतून आलेले वक्तव्य असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

देवेंद्र फडणीस यांचे वक्तव्य हे पंतप्रधानांनाही मान्य नसेल, कारण नरेंद्र मोदी यांनी कायम बाळासाहेबांचा आदरच केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असे वक्तव्य आम्ही कधी अनुभवले नाही असंही एकनाथ खडसे म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

19 मार्च रोजी पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, भाजपला हरवण्यासाठी, पराभूत करण्यासाठी सर्वजण एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. पण कुणीही एकत्र आलं तरीही भारतातील जनता, महाराष्ट्रातील जनता ही मोदीजींच्या पाठिशी आहे आणि ती भाजपला निवडून देईल. आता या सर्व आघाडीत शिवसेना काय करणार याकडे आमचं लक्ष असणार आहे.

हरल्यावर विरोधकांना ईव्हीएम दिसतं, बी टीम दिसते, सी टीम दिसते. ते बोलत असतात त्याकडे फार लक्ष देण्याची आवश्यकता नाहीये असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

आम्हाला पहायलं आहे की, आता सत्तेकरता शिवसेना काय करते. तसंही आता शिवसेनेने हिंदुह्रदयसम्राट ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकरलं आहे. अजानची स्पर्धा सुरू झाली आहे त्याचा परिणाम आहे का पाहू... असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

First published:

Tags: Devendra Fadnavis, Eknath khadse, Jalgaon