जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / खोदा जेवढं खोदायचंय, मी जेलमध्ये जाणार असल्याच्या तारखा दिल्या जाताहेत : एकनाथ खडसे

खोदा जेवढं खोदायचंय, मी जेलमध्ये जाणार असल्याच्या तारखा दिल्या जाताहेत : एकनाथ खडसे


भारतीय जनता पार्टीमध्ये मी अनेक वर्ष मेहनतीने काम केलं होतं, मात्र, भाजपमध्ये मला अपमानास्पद वागणूक मिळाली

भारतीय जनता पार्टीमध्ये मी अनेक वर्ष मेहनतीने काम केलं होतं, मात्र, भाजपमध्ये मला अपमानास्पद वागणूक मिळाली

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आज महत्त्वाचं विधान केलं आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ खडसे यांच्याविरोधात चौकशी सुरु झाली आहे.

  • -MIN READ Jalgaon,Maharashtra
  • Last Updated :

जळगाव, 27 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आज महत्त्वाचं विधान केलं आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ खडसे यांच्याविरोधात चौकशी सुरु झाली आहे. जळगाव दूध संघात खडसेंचं वर्चस्व होतं. पण दूध संघात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांप्रकरणी राज्य सरकारने चौकशी समिती नेमली आहे. तसेच तिथे असलेलं संचालक मंडळ रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे जळगाव दूध संघातील खडसेंच्या वर्चस्वाला सुरुंग लागला आहे. या प्रकरणामुळे एकनाथ खडसे आणि भाजप यांच्यातील पुन्हा संघर्ष वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांनी या प्रकरणी मोठं विधान केलं आहे. आपल्याला जेलमध्ये पाठवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काही जणांनी तर जेलमध्ये जाण्याच्या तारख्या देखील दिल्या आहेत, असं खळबळजनक विधान खडसेंनी केलं आहे. “मी जेलमध्ये जाणार असल्याच्या तारखा दिल्या जात आहेत. आता सीबीआय चौकशी सुरू केली आहे. सगळ्या चौकशा लावल्या आहेत. जर काही केले नसेल तर घाबरण्याचं कारण नाही. एक रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही. केवळ बदनाम करण्याचा प्रयत्न आहे”, असं एकनाथ खडसे रोखठोकपणे म्हणाले. ( मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर तात्पुरती टोलमाफी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा ) “तुम्ही खोदा जेवढं खोदायच आहे. मात्र काही मिळणार नाही. हे सरळ लढू शकत नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने बदनाम करण्याचा प्रयत्न आहे”, असंदेखील एकनाथ खडसे म्हणाले. जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत मनोगत व्यक्त करताना एकनाथ खडसे यांनी त्यांच्या मनातली खदखद व्यक्त केल्याचं पहायला मिळाल. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या जळगाव दूध संघाच्या अध्यक्षा होत्या. पण दूध संघात दहा कोटींचा निधी शासनाची परवानगी न घेता संचालक मंडळांनी परस्पर खर्च केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच आरोपांप्रकरणी राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंना झटका बसला आहे. याच मुद्द्यावरुन खडसेंनी राज्य सरकारवर याआधीही निशाणा साधला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात