जळगाव, 21 नोव्हेंबर : एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातला वाद कमी व्हायचं नाव घेत नाहीये. एकनाथ खडसे यांच्या मुलाने आत्महत्या केली का त्याचा खून झाला? हे तपासण्याची गरज आहे, असं विधान गिरीश महाजन यांनी केलं आहे. गिरीश महाजन यांच्या या वक्तव्यावर एकनाथ खडसे यांनी पलटवार केला आहे. काय म्हणाले खडसे? ‘इतकं घाणेरडं राजकारण मी कधीही केलं नाही. हा रक्ताचा दोष असू शकतो. इतक्या खालच्या पातळीवर मी गेलो नाही. मी संस्कारांमध्ये घडलेला माणूस आहे. गिरीश भाऊंना मुलगा नसल्यामुळे मुलगा गेल्याचं दु:ख त्यांना कदाचित समजणार नाही. त्यांना जर संशय असेल तर सीबीआय चौकशी करायला गिरीश भाऊंना हरकत नाही. ईडीची लागलीच आहे. माझ्या सगळ्या चौकश्या झाल्या आहेत. त्यामुळे मुलाची सीबीआय चौकशी करायला अडचण नाही, ते सत्तेत आहेत’, असं खुलं आव्हान एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना दिलं आहे.
‘त्यांनी काय केलं याच्याविषयी, त्यांच्या खासगी जीवनात मी कधी गेलो नाही. बर्दापूर रेस्ट हाऊसला काय घडलं, याविषयी मी वाच्यता करणार नाही. त्यांच्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत, ज्याबाबत मी बोललो नाही, कारण घाणेरडं राजकारण मला करायचं नाही’, असंही एकनाथ खडसे म्हणाले. ’…तेव्हा गिरीश महाजनांनी माझे पाय धरले’, एकनाथ खडसेंचा पुन्हा हल्लाबोल