एकनाथ खडसेंची ताकद, मुक्ताईनगरमध्ये भाजप कार्यालय उघडण्यासाठीही कार्यकर्ता मिळाला नाही!

एकनाथ खडसेंची ताकद, मुक्ताईनगरमध्ये भाजप कार्यालय उघडण्यासाठीही कार्यकर्ता मिळाला नाही!

मुक्‍ताईनगर येथील भाजप कार्यलयाला लागलेल्या कुलूपावरून तालुक्यात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

  • Share this:

जळगाव, 24 ऑक्टोबर : अगदी सकाळपासून कार्यकर्त्यांची वर्दळ असलेले मुक्ताईनगरमधील भाजप कार्यालय आज अगदी सुनेसुने पाहण्यास मिळत आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशानंतर मुक्ताईनगरमध्ये भाजपला उतरती कळा लागणार असल्याचा दावा करण्यात येत होता. अशातच मुक्‍ताईनगर येथील भाजप कार्यलयाला लागलेल्या कुलूपावरून तालुक्यात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

मुक्ताईनगरमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून नाराज खडसे यांच्या पक्षांतराबाबत बोललं जात होतं. त्यातच 23 ऑक्टोबर रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं. खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने मुक्ताईनगरमधील भाजपचे काय होईल? याबाबत चर्चा रंगत असताना मुक्ताईनगर शहरातील भाजपचं अस्तित्व कमी झाल्याचे मोठे उदाहरण पाहण्यास मिळत आहे. दररोज सकाळपासून वर्दळ असलेल्या मुक्ताईनगर शहरातील भाजप कार्यालयाला लागलेले कुलूप सर्व बोलून जाते.

कार्यालयात कोणी आलेच नाही!

मुक्ताईनगर मतदारसंघात खडसे यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. भाजपने खडसे यांच्यावर आरोप केला, असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुद्धा भाजपला सोडचिठ्ठी दिली. यामुळे मुक्ताईनगर शहरात भाजप कार्यालय उघडण्यासाठी सुद्धा भाजपचा कार्यकर्ता उरला नसल्याचं चित्र आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 24, 2020, 5:15 PM IST

ताज्या बातम्या