जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'एकतर राज्यपाल राहतील नाहीतर...' संजय राऊतांचे सूचक विधान

'एकतर राज्यपाल राहतील नाहीतर...' संजय राऊतांचे सूचक विधान

'विजय करंजकर यांची आमदारकी पाइपलाईनमध्ये आहे. राज्यपालांचं त्यांच्यावर विशेष प्रेम आहे म्हणून त्यांची आमदारकी रखडली'

'विजय करंजकर यांची आमदारकी पाइपलाईनमध्ये आहे. राज्यपालांचं त्यांच्यावर विशेष प्रेम आहे म्हणून त्यांची आमदारकी रखडली'

‘विजय करंजकर यांची आमदारकी पाइपलाईनमध्ये आहे. राज्यपालांचं त्यांच्यावर विशेष प्रेम आहे म्हणून त्यांची आमदारकी रखडली’

  • -MIN READ
  • Last Updated :

नाशिक, 22 ऑक्टोबर : राज्यपाल नियुक्त आमदारांच्या (MLAs appointed by Governor)   प्रश्न गेल्या 9 महिन्यांपासून प्रलंबित आहे. राज्यपालांनी (bhagat singh koshyari) अद्याप यावर कोणताच निर्णय घेतला नसल्यामुळे राज्य सरकारमधील तिन्ही पक्ष कमालीचे नाराज आहे. ‘एकतर राज्यपाल राहतील नाहीतर विजय करंजकर आमदार होतील. मला खात्री आहे की विजय करंजकरच आमदार होतील’ असं सूचक विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत  (sanjay raut ) यांनी केलं. शिवसेना नेते संजय राऊत यांच नाशिकच्या घोटी येथील पक्ष कार्यलयाच्या उद्घघाटन कार्यक्रमाच्या आले होते. यावेळी बोलत असताना संजय राऊत यांनी सावरकर वादावर आपली रोखठोक भूमिका मांडली. ‘उत्तर महाराष्ट्र प्रवेशद्वार घोटीत शिवसेनेचा आमदार असता तर बरं वाटलं असतं. मात्र यापुढे इथं शिवसेनेचा आमदार असेल. शिवसेनेच्या शाखेला आम्ही न्यायालय म्हणतो. घराघरातील भांडण शाखेत सोडवले जातात. विजय करंजकर यांची आमदारकी पाइपलाईनमध्ये आहे. राज्यपालांचं त्यांच्यावर विशेष प्रेम आहे म्हणून त्यांची आमदारकी रखडली, असं राऊत म्हणाले.

Realme कंपनीच्या या हँडसेटवर बंपर डिस्काऊंट; फोनची किंमत अवघे…

तसंच, गेल्या नऊ महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा प्रलंबित आहे. या मुद्यावर संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना टोला लगावला.  ‘एकतर राज्यपाल राहतील नाही तर विजय करंजकर आमदार होतील. मला खात्री आहे की विजय करंजकरच आमदार होतील’ असं सूचक विधान राऊत यांनी केलं. ‘माकड हा आपला पूर्वज आहे. सावरकर, महात्मा गांधी, कोणीही असले. माकडाला आपण वंशज मानलचं पाहिजे. माकड आहे म्हणून आज आपण आहोत. वीर सावरकर हे वीर सावरकर आहेत, मुख्यमंत्री उद्धवजी हे स्वतः सावरकरवादी आहे. कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला, तर सूर्याचं तेजचं त्याला जाळून टाकेल’ अशा शब्दांत राऊत यांनी नितीन राऊत यांना फटकारून काढले. Reliance लवकरच आणणार JioPhone Next; दिवाळीच्या आधीच धमाका, जाणून घ्या फिचर्स गेल्या असंख्य वर्षात सावरकरांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र ते महानायक राहतील, या देशातील विशिष्ट वर्गाने सावरकरांना कायम बदनाम करण्याचा कायम प्रयत्न केला. सावरकरांचं देशातील स्वातंत्र लढ्यातील योगदान इतिहासातील पानांवरून कोणाला पुसता येणार नाही’ असंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात