राहुल पाटील, प्रतिनिधी पालघर, 14 सप्टेंबर : पालघरच्या सफाळे पूर्व भागातील जंगली डॅम हा दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालली आहे. जंगली डॅममध्ये पोहण्यासाठी गेलेल्या आठवीत शिकणाऱ्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पिक पाटील असं या मुलाचं नाव आहे. कल्पिक पाटील हा विराथन बुद्रुक रांजणपाडा येथील रहिवाशी होता. कल्पिक आपल्या मित्रासह जंगली डॅमवर गेला होता. मित्रासोबत पाण्यात उतल्यानंतर अचानक कप्लिक पाण्यात बुडायला लागला. त्याच्या मित्रांनी आणि तिथे उपस्थितीत असलेल्या लोकांनी आरडाओरडा करून मदतीसाठी याचना केली. पण तोपर्यंत उशीर झाला होता. पाण्याच्या खोलीचा अंदाज न अपल्याने कल्पिकचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून सफाळे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (भंडारा-गोंदियात पावसाचा हाहाकार, गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 33 दरवाजे उघडले) याच डॅममध्ये मागील काळात ही अशा दुर्घटना घडल्या असून या ठिकाणी कोणतेही सूचना फलक लावण्यात आले नाहीत. त्यामुळे आता पर्यंत अनेकांना या डॅममध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. पुराच्या पाण्यात मनोरुग्णाने मारली उडी दरम्यान, वर्धा जिल्ह्यात सगळीकडे पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. सततच्या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहे. नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात एका मनोरुग्ण व्यक्तीने उडी मारल्याने तो पुराच्या पाण्यात वाहून गेला. ही घटना आर्वी तालुक्याच्या कासारखेडा येथे घडली. सहा तासांच्या शोध मोहिमेनंतरही व्यक्ती मिळून आला नसल्याची माहिती खरांगणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांनी दिली. कृष्णा नान्हे (४८) रा. सावध असे पुराच्या पाण्यात उडी घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कृष्णा नान्हे याने आज पहाटे ६ वाजताच्या सुमारास कासारखेडा गावातील पुलावरुन पुराच्या पाण्यात उडी घेतली. या घटनेची माहिती मिळताच खरांगणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर हे त्यांच्या टिमसह घटनास्थळी दाखल झाले आणि व्यक्तीचा शोध घेणे सुरू केला आहे. सावध गावात वर्धा मुख्यालयातील रेस्क्यू पथक बोलाविण्यात आले. डिझेल बोटीच्या सहाय्याने संपूर्ण पुराच्या पाण्यात पथकातील कर्मचाऱ्यांनी कृष्णाचा शोध घेतला. शोध पथकाने पवनार येथील धाम नदी पात्रापर्यंत कृष्णाचा शोध घेतला. मात्र, सहा तासांचा कालावधी उलटूनही कृष्णाचा मृतदेह मात्र, मिळून आला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.