मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आताची मोठी बातमी! ठाकरेंचे विश्वासू अधिकारी ईडीच्या रडारवर; BMC आयुक्त चहल यांना नोटीस

आताची मोठी बातमी! ठाकरेंचे विश्वासू अधिकारी ईडीच्या रडारवर; BMC आयुक्त चहल यांना नोटीस

चहल यांनी जलसंपदा विभागाचं प्रधान सचिव म्हणूनही काम पाहिलेलं आहे.

चहल यांनी जलसंपदा विभागाचं प्रधान सचिव म्हणूनही काम पाहिलेलं आहे.

चहल यांनी जलसंपदा विभागाचं प्रधान सचिव म्हणूनही काम पाहिलेलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 13 जानेवारी : मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना ईडीने समन्स पाठवले आहे. तसेच इक्बाल सिंह चहल यांना सोमवारी ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. 

चहल यांनी जलसंपदा विभागाचं प्रधान सचिव म्हणूनही काम पाहिलेलं आहे. तसेच आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी मानली जाणाऱ्या धारावी झोपडपट्टीच्या विकासात चहल यांची मोठी आणि महत्त्वाची भूमिका होती. ते धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. ते वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाचे सचिवही होते. तसेच औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. याशिवाय त्यांनी म्हाडाचं अध्यक्षपद आणि उत्पादन शुल्क आयुक्त म्हणूनही काम पाहिलं आहे.

दरम्यान, आता कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने बीएमसी आयुक्त चहल यांना चौकशीसाठी बोलावले आहे. सोमवारी ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे.

मुंबईतील कोरोना परिस्थिती हातळण्यात महत्त्वाची भूमिका

मुंबईत कोरोना विस्फोट सुरु होता त्यावेळी मुंबई महापालिकेने प्रचंड मोठं आणि महत्त्वाचं काम केलं. कोरोना संकट कळात लाखो नागरिकांचं निधन झालं. पण कोट्यवधी नागरिकांना वाचवण्यात मुंबई महापालिकेला यश आलं. विशेष म्हणजे मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने महापालिकेपुढे मोठं आव्हान होतं. पण महापालिकेने ते आव्हान लिलया पेललं.

या दरम्यान महापालिकेचं नेतृत्व करणाऱ्या इक्बाल सिंह चहल यांची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरली. चहल यांनी वेळोवेळी सर्वसामन्यांशी, महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधत महत्त्वाचं आवाहन केलं. तसेच अनेक नियमांची अंमलबजावणी केली. त्यांच्या अंमलबजावणीमुळेच मुंबईतील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली.

First published:

Tags: BMC, ED (Enforcement directorate)