यवतमाळ, 4 सप्टेंबर : कोरोनां (Coronavirus) संकट असतानाच आता यवतमाळ जिल्ह्यात डेंगू (Dengue), मलेरियाने (Malaria) डोकं वर काढलं आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. विशेतः हे प्रमाण लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाण आढळून आलं आहे त्यामुळे पालकांमध्ये भीती निर्माण झाली.
अलिकडे वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात ताप, खोकला, सर्दीच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय किटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतोय. मात्र रुग्णांचे प्रमाण कमी होताना दिसत नाहीये. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात ताप, सर्दी ,खोकला, डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण खूपच जास्त आहे. उपचारासाठी रुग्णांना रांगेत उभं राहावे लागत आहे. याशिवाय खाजगी रुग्णालयात सुद्धा रुग्णांची संख्या कमी नाहीये. शहारा लगतच्या ग्रामीण भागात तर डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. या परिसरात घरोघरी ताप, खोकला, सर्दीचे रुग्ण आहेत. त्यातील बरेच रुग्ण हे घरीच उपचार करताना दिसतात तर काही जण औषधींचा दुकानात जाऊन स्वतःच औषध घेत आहेत. हा संपूर्ण प्रकार जीवावर बेतण्यासारखा आहे.
कल्पिता पिंपळेंवरील हल्ल्यानंतर ठाणे मनपाने घेतला मोठा निर्णय
यवतमाळ जिल्ह्यात 66 प्राथमिक आरोग्य केंद्र, 435 उपकेंद्र आहेत. याठिकाणी आतापर्यंत 3417 ईलायझा आणि रॅपिड टेस्ट केल्या. त्यापैकी 181 रुग्ण डेंग्यूचे आढळून आल्याची नोंद आरोग्य विभागात आहे. परंतु या पेक्षा किती तरी जास्त रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. 2 ते 18 या वयोगटातील मुलांमध्ये डेंग्यू, टायफाईड आणि मलेरिया या आजाराची लक्षणं आढळून येत असल्याने सगळीकडे रूग्णालय हाऊसफूल झाल्याचे चित्र आहे.
लहान मुलांना डेंग्यू, टायफाईड आणि मलेरियामुळे तीव्र स्वरूपाचा ताप, अंग दुःखी, डोकेदुखी, अंगावर फुरळ येणे अशी लक्षणे दिसून येत आहेत. अशा प्रकारची कोणतीही लक्षण दिसले तरी ते अंगावर काढू नये. शिवाय डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नये. डेंग्यू सारख्या आजारावर नियंत्रण मिळवायचे असेल तर कोरडा दिवस म्हणून एक दिवस पाळावा आणि सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा असं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
नागपुरातही डेंग्यूचं थैमान
नागपूर मधील डेंग्यूचे रुग्ण -770
लहान मुलांची संख्या - 515
डेंग्यूमुळे मृत्यू - 3
अमरावतीतही साथीच्या आजाराचं थैमान
अमरावती जिल्ह्यात गेल्या महिन्याभरा पासून डेंग्यू, मलेरिया आणि हिवतापाने कहर केला आहे. तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाल रोग वार्डात बेडच रिक्त नसल्याने एका बेडवर दोन ते तीन रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आलेली आहे. बालकांच्या वार्डमध्ये सध्या 59 बालके उपचार घेत आहेत. तर ग्रामीण भागात भागातही बिकट अवस्था आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली असल्याचे चित्र आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.