मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कल्पिता पिंपळेंवरील हल्ल्यानंतर ठाणे मनपाचा मोठा निर्णय, हल्ले रोखण्यासाठी सुरक्षा रक्षकांना आत्मरक्षणाचे धडे

कल्पिता पिंपळेंवरील हल्ल्यानंतर ठाणे मनपाचा मोठा निर्णय, हल्ले रोखण्यासाठी सुरक्षा रक्षकांना आत्मरक्षणाचे धडे

अधिकाऱ्यांची सुरक्षा बळकट करण्यासाठी सुरक्षा रक्षकांना चाकू हल्ला रोखण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांची सुरक्षा बळकट करण्यासाठी सुरक्षा रक्षकांना चाकू हल्ला रोखण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांची सुरक्षा बळकट करण्यासाठी सुरक्षा रक्षकांना चाकू हल्ला रोखण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

ठाणे, 4 सप्टेंबर : फेरीवाल्यांविरोधात कारवाईसाठी गेलेल्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. त्यानतंर आता ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) खडबडून जागी झाली असून ठाणे महानगरपालिका हद्दीत फेरीवाले आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई करायला जाताना भविष्यातील होणारे चाकू हल्ले रोखण्यासाठी पालिकेच्या तसेच बोर्डाच्या सर्व सुरक्षा रक्षकांना आत्मरक्षण, चाकू हल्ला संरक्षणचे धडे देण्यात आले. आजपासून 100 हून अधिक सुरक्षा रक्षकांना मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण (Training for security guards) देण्यात येणार आहे.

ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या सूचनेनुसार आजपासून या प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली. एखाद्यावेळी अधिकाऱ्यांवर अचानक होणारे हल्ले कसे रोखावे, कशाप्रकारे स्वतःचे व अधिकाऱ्याचे रक्षण करावे? या करीता मार्शल आर्ट, ज्युडो यांचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिके करून घेण्यात आले. दि. लेजंट ऑफ मार्शल आर्ट, मुंब्रा या संस्थेतर्फे प्रशिक्षण देण्यात आले. यात 54 अंगरक्षक तसेच 45 महाराष्ट्र सुरक्षा बलच्या सुरक्षाकर्मिनी सहभाग घेतला होता.

यापूर्वीच्या आयुक्तांनी केलं ते विपीन शर्मांना का नाही जमत? कल्पिता पिंपळेंवरील हल्ल्यानंतर विचारला जातोय सवाल

30 ॲागस्टच्या संध्याकाळीही साडे सहाच्या सुमारास ठाण्यातील कासारवडवली येथील यशराज इमारती समोर सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अमरजीत यादव नावाच्या फेरीवाल्याने चाकूने हल्ला केला. ज्यात कल्पिता पिंपळे यांना 2 बोटे आणि त्यांचा सुरक्षा रक्षक सोमनाथ पालवे यांना 1 बोट गमवावे लागले होते. हा भ्याड हल्ला होता. याच पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांचा आणि सुरक्षा रक्षकांचा बचाव हल्लेखोरांपासून रोखण्यासाठी काय उपाययोजना करण्यात यावी यासाठी ठाणे महापालिकेने पाऊल उचलले असल्याचे यावेळी मुख्य सुरक्षा अधिकारी मच्छिंद्र थोरवे यांनी सांगितले.

अश्या प्रकारचे प्रशिक्षण देणे फायदेशीर आहेच पण जोपर्यंत फेरीवाल्यांचा बंदोबस्त होणार नाही तो पर्यंत असे हल्ले होतच राहतील. याचमुळे भ्रष्ट अधिकारी जेरबंद होत नाही तोपर्यंत आहे हल्ले होतच राहणार.

First published:

Tags: Thane