गोंदिया, 12 ऑक्टोबर : नवरात्रौत्सवात (Navratri) महिलांचा दुर्गावता पहायला मिळाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील डव्वा गावात महिलांच्या दुर्गा देवीचा (Durga Avtar) अवतार पहायला मिळाला आहे. गावात दारू बंदी असतांना अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्याला जाब विचारायला गेलेल्या महिलांवर दारू विक्रेत्याने चाकू उगारला. यानंतर संतप्त झालेल्या महिलांनी दारू विक्रेत्याला चांगला चोप दिला (Illegal liquor seller beaten by women). ही घटना गोंदिया (Gondia) जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील डव्वा या गावात (Davva Village) घडली आहे. गावात दारूच्या आहारी जाऊन अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. हेच लक्षात घेत डव्वा येथे महिलांनी दारू बंदी समिति स्थापन करून दारु विक्रिस विरोध करण्यास सुरुवात केली आहे. या समितिला डव्वा येथील बसस्टॉपच्या मागे अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गावातील महिला घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी महिलांनी दारू विक्रेत्याला जाब विचारला असता दारू विक्रेत्यानी चाकू काढत शस्त्र दाखवून धाक दाखविन्याचा प्रयत्न केला. मात्र चाकूच्या धाकाला महिला अजिबात घाबरल्या नाहीत. महिलांच्या अंगात जणु दुर्गा सरसावली असल्याचे दिसून आले आणि महिलांनी त्या दारू विक्रेत्याला चांगला चोप देत हुसकावून लावले. या घटने प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दारु विक्रेत्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नाशकातील मंगल कार्यालयात सुरू होता अवैध दारू कारखाना नाशिक पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास मंगल कार्यालयावर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. मंगल कार्यालयात सुरू असलेला अवैध दारूचा कारखाना नाशिक ग्रामीण पोलिसांनी उध्वस्त केला आहे. या कारवाई दरम्यान कोट्यवधी रुपयांची बनावट दारू जप्त केली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांची पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई केली. मंगलकार्यालयात सुरू असलेला अवैध दारू कारखाना पोलिसांनी उद्धवस्त केला. नाशिकच्या ग्रामीण भागात राजरोस पणे नागरिकांच्या जीविताशी खेळ सुरू होता. घटनास्थळावरुन पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील दारू कारखानन्याच्या नावाचे बॉक्सही जप्त करण्यात आले आहेत. मंगल कार्यलय चालकासह 13 संशयित आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. तसेच पोलिसांच्या कारवाईत कोट्यवधी रुपयांची दारू आणि दारू बनविण्याच साहित्य जप्त करण्यात आले आहे. नाशिक - औरंगाबाद महामार्गावर असलेल्या चांदोरी गावाजवळील एका मंगल कार्यलयात सुरू असलेला अवैध दारू बनविण्याचा कारखाना नाशिक ग्रामीण पोलिसांनी उद्धवस्त केला. नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक सचिन पाटील आणि त्यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी हा कारखाना उद्धवस्त केला आहे. टॅंगो,प्रिन्स-संत्रा, राकेट आणि गोवा या तीन देशी बनावटीच्या दारूची डुप्लिकेट पॅकिंग करून ही बनावट दारू जिल्ह्यासह राज्याबाहेर विक्रीसाठी तयार केली जात होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.