Home /News /nashik /

मंगल कार्यालयात मध्यरात्री पोलिसांची धाड; अवैध दारूचा कारखाना उद्धवस्त, कोट्यवधींची बनावट दारू जप्त, LIVE VIDEO

मंगल कार्यालयात मध्यरात्री पोलिसांची धाड; अवैध दारूचा कारखाना उद्धवस्त, कोट्यवधींची बनावट दारू जप्त, LIVE VIDEO

LIVE VIDEO: मंगल कार्यालयात मध्यरात्री पोलिसांची धाड, आतमधील दृश्य पाहून सर्वच झाले अवाक

LIVE VIDEO: मंगल कार्यालयात मध्यरात्री पोलिसांची धाड, आतमधील दृश्य पाहून सर्वच झाले अवाक

Nashik Police raid on Marriage hall: मंगल कार्यालयात सुरू असलेला अवैध दारूचा कारखाना नाशिक ग्रामीण पोलिसांनी उध्वस्त केला.

    लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 12 ऑक्टोबर : नाशिक पोलिसांनी (Nashik Police) मध्यरात्रीच्या सुमारास मंगल कार्यालयावर धाड (Raid on Marriage hall) टाकून मोठी कारवाई केली आहे. मंगल कार्यालयात सुरू असलेला अवैध दारूचा कारखाना नाशिक ग्रामीण पोलिसांनी उध्वस्त (bust illegal liquor factory) केला आहे. या कारवाई दरम्यान कोट्यवधी रुपयांची बनावट दारू जप्त केली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik rural police) केलेल्या या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांची पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई केली. मंगलकार्यालयात सुरू असलेला अवैध दारू कारखाना पोलिसांनी उद्धवस्त केला. नाशिकच्या ग्रामीण भागात राजरोस पणे नागरिकांच्या जीविताशी खेळ सुरू होता. घटनास्थळावरुन पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील दारू कारखानन्याच्या नावाचे बॉक्सही जप्त करण्यात आले आहेत. मंगल कार्यलय चालकासह 13 संशयित आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. तसेच पोलिसांच्या कारवाईत कोट्यवधी रुपयांची दारू आणि दारू बनविण्याच साहित्य जप्त करण्यात आले आहे. नाशिक - औरंगाबाद महामार्गावर असलेल्या चांदोरी गावाजवळील एका मंगल कार्यलयात सुरू असलेला अवैध दारू बनविण्याचा कारखाना नाशिक ग्रामीण पोलिसांनी उद्धवस्त केला. नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक सचिन पाटील आणि त्यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी हा कारखाना उद्धवस्त केला आहे. टॅंगो,प्रिन्स-संत्रा, राकेट आणि गोवा या तीन देशी बनावटीच्या दारूची डुप्लिकेट पॅकिंग करून ही बनावट दारू जिल्ह्यासह राज्याबाहेर विक्रीसाठी तयार केली जात होती. वाचा : लातुरातील गुटखा किंगला हादरा; 2 दिवसांच्या छापेमारीत तब्बल सव्वा कोटींचा गुटखा जप्त परिसरातील लोकांना संशय येऊ नये म्हणून मंगल कार्यलयात रात्रीच्या वेळी हा बनावट दारू बनविण्याचा कारखाना सुरू होता. 15 ते 20 कर्मचाऱ्यांच्या मदतीने पूर्णतः ऑटोमॅटिक पद्धतीने या कारखान्यातून दररोज 4 ते 5 ट्रक बनावट दारू बनवली जात होती. नाशिक ग्रामीण पोलिसांनी या पूर्वी केलेल्या कारवाईत देखील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील दारू कारखान्याचे दारूचे बॉक्स मिळून आले होते. आता पुन्हा या कारवाईत याच कारखाण्याचे बॉक्स ही बनावट दारू पॅकिंग करण्यासाठी वापरले जात असल्याने या अवैध दारू बनविण्याचे धागे दोरे कुठवर जाता हे बघण महत्वाचं ठरणार आहे. ही अवैध दारू बनवणारा मुख्य सुत्रधार नेमका कोण आहे ? ही दारू राज्यात आणि राज्याबाहेर विक्री करणार रॅकेट नेमकं कुणाच आहे ? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं पोलिसांच्या तपासाचा भाग असली तरी या अवैध व्यवसायचा पसारा बघता या मागे एखाद्या मोठ्या व्यक्तीचा हात असण्याची दाट शक्यता पोलिसांना आहे. त्यामुळे आता या कारवाईत राजकारणीय व्यक्ती किंवा इतर बड्या लोकांची नाव पुढे आली तर नवल वाटू नये.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Crime, Illegal liquor, Nashik

    पुढील बातम्या