माणगाव, 08 नोव्हेंबर : मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर नजीक कशेडी घाट रस्त्यावर चोळई गाव हद्दीत भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये रिक्षा चालकासह 3 विद्यार्थिनींचा जागीच मृत्यू झाला आहे. परिक्षा देऊन या तिन्ही विद्यार्थिनी घरी चाललेल्या होत्या. या अपघातामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कशेडी घाट मार्गावर चोळई गावच्या वळणावर हा अपघात घडला. वाळूने भरलेला डंपर अचानक रिक्षावर उलटला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये उमर बडुर रीक्षा चालक आणि हलिमा पोतेरे (23 राहणार, नांदवी), असिया बडुर (20 रा. गोरेगाव), नाजनिन करबेलकर (वय 23 रा. टेमपाले) अशी मृतांची नाव आहेत.
(घराच्या भिंतीसाठी रक्ताची नाती जीवावर उठली, मोठ्या भावाने वडील आणि लहान भावावर केले चाकूने वार!)
माणगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरातील या विद्यार्थिनी रिक्षाने खेड येथे परिक्षेसाठी गेल्या होत्या. परीक्षा आटोपून परतत असताना हा अपघात झाला. कशेडी घाट रस्त्यातील चोळई गावच्या वळणावर वाळूने भरलेला डंपर रिक्षावर उलटला. त्यात चिरडून चौघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर दोन्ही वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आली असून चारही मृतदेह पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.
अमरावतीत कुऱ्हा मार्गावर रिक्षाला ट्रकची धडक, 2 जणाचा मृत्यू
दरम्यान, तिवसा ते कुऱ्हा मार्गावर वाठोडा गावानजीक भरधाव ट्रकने ऑटो व दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 14 जण गंभीर जखमी असून जखमीमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे.
(पुणे : वाढदिवस साजरा करायला आलेल्या तरुणासोबत भयानक कांड, घटनेने खळबळ)
तिवस्यावरून कुऱ्हा मार्गे जाणारा एम.एच 46-1505 क्रमांकाचा भरधाव ट्रकने कुऱ्हावरून प्रवासी घेऊन येणाऱ्या ऑटो क्रमांक एम.एच 27 बीडब्लू 3833 व एम.एच 27डी.9543 क्रमांकाच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने मोठा अपघात घडला. या अपघातात घटनास्थळी दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला असून एकाचा अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामध्ये एकूण 14 जण जखमी असून 7 जण गंभीरित्या जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना तिवसा उपजिल्हा रुग्णालयाानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात हसवण्यात आले. अपघाताची माहिती मिळतात तिवसा मतदारसंघाच्या आमदार, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news