शिवसेनेला दुहेरी धक्का शिवसेनेला जळगावमध्ये दुहेरी धक्का बसला आहे. एकीकडे सर्वपक्षीय आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. तर दुसरीकडं इतर पक्षातून शिवसेनेत आलेले नगरसेवक स्वगृही परतत आहेत. भाजपातून आलेले 10 नगरसेवक पुन्हा मूळ पक्षात जात असून 3 नगरसेवक शिवसेना सोडण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस का पडला बाहेर? सर्व पक्षांनी एकत्र येत निवडणूक लढण्याची योजना सफल होण्याची शक्यता दिसत असतानाच काँग्रेसनं बाहेर पडत बंडाचं निशाण उगारलं आहे. सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची कल्पना चांगली होती. मात्र असं करत असताना सर्वांना समान अधिकार मिळण्याची गरज आहे. सर्व निर्णय एकतर्फी होणार असतील, तर आम्हाला अशा आघाडीत रस नसल्याचं सांगत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पश हे वाचा - "मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय" म्हणणाऱ्या फडणवीसांना पवारांचा चिमटा, म्हणाले.. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या सर्वपक्षीय आघाडीसाठी पुढाकार घेतला होता. राज्यातील सूत्र हे स्थानिक पातळीवर राबवणं आणि मतांचं विभाजन टाळत विजय संपादन करणं, हे यामागचं उद्दिष्ट होतं. मात्र राज्याच्या पातळीवरील सुसूत्रता स्थानिक पातळीवर येत नसल्याचा अनुभव पाटील यांनी व्यक्त केला. आम्ही केवळ एकत्र राहायचं पण सर्व निर्णय दुसरेच घेणार असतील, तर ते आपल्याला मान्य नसल्याचं सांगत आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. प्रदेशाध्यक्षांनी दिले होते संकेत पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक पातळीवरील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर महाविकास आघाडीत त्यावरून उलटसुलट चर्चादेखील रंगली होती. आता जळगावच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या बाबतीत काँग्रेसने स्वबळाचा नारा खरा करून दाखवला आहे. याचे काय परिणाम निकालावर होतात, ते लवकरच कळेल.जळगावमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्व पक्षांनी एकत्र येत निवडणूक लढवण्याची योजना हाणून पाडत काँग्रेसनं वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. pic.twitter.com/XD9cDTkuGL
— News18Lokmat (@News18lokmat) October 13, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.