Home /News /maharashtra /

'आधी माहिती घ्या, उगाच बोलू नका', जयंत पाटलांनी नाना पटोलेंना फटकारले

'आधी माहिती घ्या, उगाच बोलू नका', जयंत पाटलांनी नाना पटोलेंना फटकारले

आधी संपूर्ण  माहिती घ्यावी आणि राज्यपातळीवरील नेत्यांनी राष्ट्रीय राजकारणावर कश्याला बोलावे

आधी संपूर्ण माहिती घ्यावी आणि राज्यपातळीवरील नेत्यांनी राष्ट्रीय राजकारणावर कश्याला बोलावे

आधी संपूर्ण माहिती घ्यावी आणि राज्यपातळीवरील नेत्यांनी राष्ट्रीय राजकारणावर कश्याला बोलावे

पंढरपूर, 21 फेब्रुवारी : तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (chandrashekhar rao) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे तिसऱ्या आघाडीची चर्चा रंगली आहे. पण, काँग्रेसच्या नेत्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. 'नाना पटोले (nana patole) यांनी आधी माहिती घ्यावी आणि राज्यपातळीवरील नेत्यांनी राष्ट्रीय राजकारणावर कश्याला बोलायचे असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी टोला लगावला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर यांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर टीका केली होती 'काँग्रेसशिवाय आघाडी पूर्ण होऊ शकत नाही, असं अशी टीका पटोलेंनी केली होती. त्यांच्या या टीकेला जयंत पाटील यांनी उत्तर दिले. 'मोदी सरकारविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचं आहे. त्यादृष्टीने वरीष्ठ नेत्यांच्या बैठका होत आहे.  नाना पटोले यांनी आधी संपूर्ण  माहिती घ्यावी आणि राज्यपातळीवरील नेत्यांनी राष्ट्रीय राजकारणावर कश्याला बोलावे, असा टोला पाटील यांनी लगावला. तसंच,  'महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य आहे त्यामुळे टोकाची भाषा टाळली पाहिजे पण सुड उगवण्याचा प्रकार हे  दिल्लीतील सरकार आल्यापासून वाढला असल्याने प्रतिक्रिया वाढल्याने असे प्रकार घडत असल्यातरी दोन्ही बाजूने तारतम्य बाळगावे अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी संजय राऊत आणि किरीटी सौमय्या यांच्या वादावर दिली. मोदी सरकारमुळे राजकारणाचा स्तर खालावला -नाना पटोले दरम्यान, 'देशातील राजकारणाचा स्थर खलावल आहे. भाजपा केंद्रात व राज्यात सत्तेत आल्यापासून केंद्रीय तपास योजनेच्या माध्यमातून लोकांना त्रास देण्याचा काम करते त्यामुळे देशातील राजकारणाचा स्तर घालवले आहे' असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. ' चीन सोबत राहुल गांधी संपर्कात आहेत असे भाजपवाले बोंबा मारत आहेत. पण अरुणाचल प्रदेश येथील काही जागेवर चीनने कब्जा केला आहे. त्या संबंधात नरेंद्र मोदी का बोलत नाही. भाजपची सत्ता आल्यापासून चीन सोबत 59% व्यापार सुरू आहे. एकीकडे भाजप लोकांना गुमराह करण्याचे काम करत आहे, अशी टीकाही पटोलेंनी केली. 'हिजाब शाळेचा ड्रेस कोड सगळ्यांनी स्वीकारावा असे मत अमित शाहा यांनी केले आहे, पण अमित शहा हे हिंदू मुस्लिम यांचे भांडण लावण्याचा काम करत असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या