जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कौतुकास्पद! बहिणीसाठी किडनी दान केल्यानंतर प्रकृती नाजूक, तरीही कोरोना रुग्णांसाठी कसली कंबर

कौतुकास्पद! बहिणीसाठी किडनी दान केल्यानंतर प्रकृती नाजूक, तरीही कोरोना रुग्णांसाठी कसली कंबर

कौतुकास्पद! बहिणीसाठी किडनी दान केल्यानंतर प्रकृती नाजूक, तरीही कोरोना रुग्णांसाठी कसली कंबर

कराड येथील डॉ. जयश्री देसाई (Dr. Jayashree Desai) मात्र एक किडनी दान केल्यानंतरही (Donated to a kidney sister) कोरोना रुग्णांसाठी दिवसरात्र झटत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

कराड, 26 मे: मागील काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona pandemic) वेगानं पसरत आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona 2nd wave) अत्यंत घातक ठरत असून अनेकजण कोरोनाच्या कचाट्यात सापडत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बहुतांशी डॉक्टर कोरोना रुग्णावर उपचार करायला धजावत आहेत. तर काहींनी नोकऱ्याही सोडल्या आहेत. अशा स्थितीत कराड येथील डॉ. जयश्री देसाई (Dr. Jayashree Desai) मात्र एक किडनी दान केल्यानंतरही (Donated to a kidney sister) कोरोना रुग्णांसाठी दिवसरात्र झटत आहेत. त्यांनी आपली एक किडनी आपल्या बहिणीला दान केली त्यानंतर डॉ. देसाई यांची प्रकृती नाजूक झाली होती, अशा अवस्थेत देशाची गरज लक्षात घेऊन त्या वैद्यकीय सेवेत पुन्हा रुजु झाल्या आहेत. प्रशांत देसाई आणि जयश्री देसाई हे दोघंही पती पत्नी पेशानं डॉक्टर आहेत. पती प्रशांत देसाई हे वाई याठिकाणी शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर डॉ जयश्री देसाई यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही वर्ष खाजगी स्पेशालिटी रुग्णालयात नोकरी केली. पण त्यांनी आपली एक किडनी बहिणीला दान केल्यानंतर 2020 पर्यंत त्या घरीच बसून होत्या. पण देशात कोरोनाची बिकट परिस्थिती पाहता त्यांनी पुन्हा वैद्यकीय सेवेत येणाचा निर्णय घेतला आहे. हे ही वाचा- Alert! हवेतूनही पसरतोय कोरोना; बचावासाठी सरकारने जारी केला नवा कोविड प्रोटोकॉल त्यानंतर त्यांना कराड तालुक्यातील काले आरोग्य केंद्राच्या मलकापूर उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली. विशेष म्हणजे मलकापूर कोविड सेंटर कराड तालुक्यातील कोरोना हॉटस्पॉट म्हणून ओळखलं जातं. याठिकाणी आजपर्यंत एकूण 1790 कोरोना रुग्ण आढळले आहेत. एकीकडे एक किडनी दान केल्यानं प्रकृती नाजूक असताना कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब घेणे, त्यांची तपासणी करणे, तर होम क्वारंटाइन असणाऱ्या रुग्णांना घरी जाऊन तपासणे आदी कामं त्या करतात. हे ही वाचा- पुरुषांमध्ये सर्वात पहिल्यांदा कोरोना लस घेणाऱ्या William Shakespeare यांचं निधन त्यांना एक सात वर्षांची मुलगी आहे. तिला घरात ठेवून घराला बाहेरून कुलूप लावून त्या कोविड रुग्णांची सेवा करायला जातात. डॉ. देसाई यांनी त्यांच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले आहेत. या घरातील सीसीटीव्हीचा ॲक्सेस मोबाईलवर घेऊन पती पत्नी दोघंही घरात एकट्या असणाऱ्या मुलीवर लक्ष ठेऊन काम करतात. एकीकडे कोरोना काळात डॉक्टरांवर काळाबाजार केल्याचे आरोप होतं असताना, हे देसाई दाम्पत्य मात्र माणुसकीचं नातं जपत कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात