• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • सर्वात जुन्या सहकाऱ्याने सोडली राज ठाकरेंची साथ, मनसेतून 11 पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

सर्वात जुन्या सहकाऱ्याने सोडली राज ठाकरेंची साथ, मनसेतून 11 पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

राजेश कदम यांच्यासह इतरही अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे.

  • Share this:
डोबिंवली, 1 फेब्रुवारी : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीआधी शहरात मनसेला (MNS) मोठा धक्का बसला आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे विद्यार्थी सेनेपासून सहकारी असलेल्या राजेश कदम यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला आहे. राजेश कदम यांच्यासह इतरही अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे. राज ठाकरे यांच्या ठाणे जिल्हा आणि मुंबईतील प्रत्येक सभेच्या सुरुवातीला मोठ्या आवाजात घोषणाबाजी करणारे म्हणून राजेश कदम यांना राज ठाकरे व्यक्तिगत ओळखत होते. राजेश कदम यांच्या सोबतच इतरही मनसेच्या महत्वाच्या पदाधिकारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजेश कदम यांच्यासह युवा कार्यकर्त्यांची मोठी फळी शिवसेनेतून राज ठाकरे यांच्या मनसेत आली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून आपण दुर्लक्षित आहोत, असं म्हणत राजेश कदम आणि इतर मनसे पदाधिकाऱ्यांनी पुन्हा घरवापसी केली आहे. मनसेतून बाहेर पडणाऱ्यांमध्ये कुणाकुणाचा समावेश? 1) राजेश शांताराम कदम मनसे प्रदेश उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहर अध्यक्ष . माजी परिवहन सभापती 2) सागर रवींद्र जेधे मनविसे डोंबिवली शहर अध्यक्ष 3) दीपक शांताराम भोसले डोंबिवली शहर संघटक,माजी परिवहन सदस्य 4) राहुल गणपुले प्रदेश उपाध्यक्ष, जनहित कक्ष 5) कौस्तुभ फकडे मनविसे डोंबिवली शहर सचिव 6 ) सचिन कस्तुर मनविसे शहर संघटक 7) स्वप्नील वाणी मनसे शाखा अध्यक्ष 8) निखिल साळुंखे मनसे उपशाखा अध्यक्ष 9) कुणाल मोर्ये मनविसे शाखा अध्यक्ष 10) महेश कदम 11) राजेश मुणगेकर शहर संघटक दरम्यान, राज्यातील विविध निवडणुकांमध्ये मनसेचा आलेख घसरल्यानंतर आजपर्यंत अनेक जुन्या नेत्यांनी मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेनं लढवलेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आलेले अनेक नेते आज इतर पक्षात गेले असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांची होणारी ही गळती रोखण्याचं मोठं आव्हान राज ठाकरे यांच्यासमोर उभं राहिलं आहे.
Published by:Akshay Shitole
First published: