डोंबिवली, 17 फेब्रुवारी : डोंबिवलीमधील एका गुन्ह्यातील 7 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला गजाआड करण्यास विष्णूनगर पोलिसांना यश आलं आहे. तुषार रणपिसे (वय 26) असं या आरोपीचं नाव आहे. कुंभारखानपाडा येथे 2014 साली आर्थिक व्यवहारावरुन तिघांनी एका व्यक्तीला मारहाण केली होती. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात सतिश रणपिसे, तुषार रणपिसे व परेश जोशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील सतिश रणपिसे व परेश जोशी यांना तत्काळ अटक करण्यात आली होती. हेही वाचा - दुहेरी हत्याकांड! भर बाजारात कारमध्ये आढळले मृतदेह; गोळ्या घालून केली हत्या कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली होती. या गुन्ह्यातील तिसरा आरोपी तुषार हा मात्र तेव्हापासून फरार होता. गुप्त बातमीदारामार्फत तुषार हा रिजन्सी गार्डन पाठीमागील धावडी गाव येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय सांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वडणे व त्यांच्या पथकाने सापळा रचित पोलिसांनी मंगळवारी रात्री गावातून तुषार याला ताब्यात घेतले. या आरोपीकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.