मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

डोंबिवलीच्या तरुणाची विश्वविक्रमाला गवसणी, तब्बल 61 दिवस दररोज धावला 42 किलोमीटर

डोंबिवलीच्या तरुणाची विश्वविक्रमाला गवसणी, तब्बल 61 दिवस दररोज धावला 42 किलोमीटर

दररोज पहाटे तीन वाजता विशाल डोंबिवली क्रीडा संकुल गाठायचा आणि धावणं सुरू करायचा.

दररोज पहाटे तीन वाजता विशाल डोंबिवली क्रीडा संकुल गाठायचा आणि धावणं सुरू करायचा.

दररोज पहाटे तीन वाजता विशाल डोंबिवली क्रीडा संकुल गाठायचा आणि धावणं सुरू करायचा.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Thane, India
  • Published by:  News18 Desk

ठाणे, 1 नोव्हेंबर : डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. कारण इथे राहणाऱ्या 29 वर्षीय विशाल स्वामी या तरुणाने तब्बल 61 दिवस दररोज 42 किलोमीटर धावून आपले नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये कायम केले आहे. हे यश मिळताच आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी स्वतः हजेरी लावून त्याला शुभेच्छा दिल्या. या आधी सलग 60 दिवस दररोज 42 किलोमीटर धावण्याचा विक्रम एक भारतीयाच्या नावावर होता, तो विशालने मोडला.

विशाल स्वामी हा 29 वर्षीय तरुण डोंबिवली स्टार कॉलनी मध्ये आपली आई, वडील बहिणीसह राहतो. विशाल हा मूळचा केरळचा आहे. मात्र, त्याचं कुटुंब नोकरी धंदा निमित्त डोंबिवलीत स्थायिक झाले. विशाल एका खासगी विमा कंपनीत काम करतो. त्याची कंपनी बंगलोरला असल्याने तो सध्या वर्क फ्रॉम होम करत आहे. गेल्या सात वर्षापूर्वी विशालला धावण्याची आवड निर्माण झाली. विशालने धावणे सुरू केलं. अनेक स्पर्धेत भाग घेत त्याने त्या स्पर्धा जिंकल्या.

विशाल, त्याचे आई व बहिणीचा देखील पाठिंबा मिळत होता. याच दरम्यान कॅन्सर जनजागृतीसाठी धावणाऱ्या कॅनडामधील टेरीफॉक्स या इसमाची कथा त्यांनी ऐकली. त्याचाच आदर्श डोळ्यापुढे ठेवून आता लोकांमध्ये धावण्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी विशाल आपलं धावून सुरूच ठेवलं. सलग 21 दिवस दररोज 21 किलोमीटर हा विक्रमदेखील विशालच्या नावावर आहे.

हेही वाचा - कोल्हापूर : ग्रामीण भागातील पोरीची गगनभरारी, वर्षाला तब्बल 60 लाखांचं पॅकेज मिळालं

हा विश्वविक्रम केल्यानंतर तो थांबला नाही. त्याने 61 दिवसांचा विश्वविक्रम करण्याचा जिद्द ठेवली. डोंबिवली पूर्वेकडील क्रीडा संकुलात त्याने एक सप्टेंबर पासून पुन्हा धावणे सुरू केलं. दररोज पहाटे तीन वाजता विशाल डोंबिवली क्रीडा संकुल गाठायचा आणि धावणं सुरू करायचा. तीन वाजेपासून सुरू झालेलं त्याचं धावणं आठ वाजेपर्यंत सुरूच असायचं. सलग पाच तास न थांबता विशाल धावत होता. विशाल 42 किलोमीटर धावत होता. सातत्याने 61 दिवस दररोज 42 किलोमीटर धावून त्याने या विश्वविक्रमाला गवसणी आज घातली.

त्याला धावताना पाहून अनेक डोंबिवलीकरांना प्रश्न पडायचा की हा नेमका इतका का धावतोय. काही दिवसांनी त्याच्या धावण्याचे कारण समजतात डोंबिवलीकरांनी देखील त्याला प्रोत्साहन दिलं. आज 61 व्या दिवशी त्याने हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. विश्वविक्रमाला गवसने घालतात डोंबिवलीकर यांनी ढोल ताशांच्या गजरात त्याच स्वागत केलं.

त्यानंतर डोंबिवली शहरातील विविध सामाजिक संस्था, शिंदे गट उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, काँग्रेसचे संतोष केणे यांच्यासह राजकारणी मंडळी तसेच महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी देखील विशालची भेट घेत त्याचे कौतुक करत त्याचा सत्कार केला. यावेळी विशालने पाठींबा व प्रोत्साहन देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. तसेच माझं धावणं पुढे सुरू ठेवणार असल्याचेही विशालने यावेळी सांगितलं.

First published:

Tags: Running local, Success story, Thane, World record