ठाणे, 12 एप्रिल : आता पाळीव श्वानाची (कुत्रे) नोंद करावी लागणार आहे. याबाबत ठाणे मनपाने (Thane MNC) आदेश जारी केले आहेत. यामुळे आता पालिकेत नोंद केल्याशिवाय कुत्रे पाळता येणार नाहीत. नोंद न केल्यास कारवाई केली जाणार आहे. तसेच नोंद केल्यावर मनपा विशिष्ट नोंदणी क्रमांक देणार आहे. या आदेशानुसार पाळीव कुत्र्यांची वेळोवेळी माहिती पालिकेला अपडेट करावी लागणार आहे. असे आदेश काढण्यामागे पालिकेचा काय उद्देश आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही.
आदेशात नेमके काय आहे?
ठाणे महानगरपालिकेने श्वान (कुत्रे) पाळण्याकरिता नियमावली तयार केलेली आहे. या नियमावली प्रमाणे ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील श्वान मालकांनी नोंद करणे आवश्यक आहे. ज्या नागरिकांनी पाळीव श्वान पाळलेले आहेत आणि ज्यांनी याबाबत नोंद केलेली नाही, अशा नागरिकांनी आपल्या पाळीव श्वानाकरीता लवकरात लवकर नोंद करावी.
हेही वाचा - Weight Gain: वजन वाढवणं अवघड काम नाही, आहारात नियमित या 5 गोष्टी घेऊन व्हा धष्टपुष्टनूतनीकरण करणे आवश्यक -
तसेच पुढे आदेशात म्हटले आहे की, ज्या नागरिकांनी आपल्या पाळीव श्वान संदर्भात पालिकेत नोंद केली आहे, त्यांना यासंदर्भातील नूतनीकरण करणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन न केल्यास पाळीव कुत्रे नोंद नियमांतर्गत संबंधित नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
ठाण्यात आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार -
दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेकडे आज राज्याचं लक्ष लागून आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत मशिदीसमोर हनुमान चालिसा लावा असा आदेश दिला होता. यानंतर सर्वच थरातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे मनसेचे नेतेही अडचणीत आले होते. त्यानंतर आता आज (12 एप्रिल) ठाणे येथे राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यामुळे पूर्ण राज्याचे लक्ष या सभेकडे लागले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.