Home /News /maharashtra /

बस अपघातात संपूर्ण कुटुंबाला अपंगत्व, उपचाराकडे एसटी महामंडळाचं दुर्लक्ष

बस अपघातात संपूर्ण कुटुंबाला अपंगत्व, उपचाराकडे एसटी महामंडळाचं दुर्लक्ष

अंबरनाथच्या घाडगे नगर परिसरात राहणारे बाळू हातेकर गेल्या तीन महिन्यापासून अंथरुणाला खिळून आहेत.

अंबरनाथ, 07 मार्च : एसटी चालकाच्या (ST Bus) चुकीमुळे झालेल्या अपघातात अंबरनाथमधील (Ambarnath) बाळू हातेकर (Balu Hatekar) यांच्या संपूर्ण कुटूंबालाच अपंगत्व आलं आहे. गेल्या 3 महिन्यापूर्वी मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai Pune Express way) हा अपघात झाला होता.अपघातानंतर एसटी महामंडळ (Maharashtra State Transport Corporation) जखमींचा खर्च करणार होतं, मात्र पूर्ण बरा होण्याच्या अगोदरच हातेकर यांना हॉस्पिटलने डिस्चार्ज दिला. यपरिणामी अपघातात जखमी पायातून रक्त आणि पु सतत येत असल्याने  अंथरुणाला खिळण्याची वेळ त्यांच्यावर आली. घरातील कर्ता पुरुषच तीन महिन्यापासून अंथरुणाला खिळल्याने जगायचं कसं असा प्रश्न त्यांच्या कुटुंबासमोर उभा ठाकला आहे. अंबरनाथच्या घाडगे नगर परिसरात राहणारे बाळू हातेकर गेल्या तीन महिन्यापासून अंथरुणाला खिळून आहेत. 26 नोव्हेंबरला कुटुंबासह ते आपल्या मुलीला सातारा येथे सासरी सोडण्यासाठी गेले होते. त्याठिकाणाहून परतत असतांना मुंबई पुणे पळस्पे महामार्गावर एस .टी चालकाने ओव्हरटेक करण्याच्या नादात एका ट्रेलरला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर 16 जण गंभीर जखमी झाले.  जखमींमध्ये बाळू हातेकर, त्यांची पत्नी आणि मुलीचा समावेश होता. हा अपघात एस.टी चालकाच्या चुकीमुळे  झाल्याचे समोर आल्यानंतर जखमींचा उपचार खर्च एस.टी महामंडळ उचलणार असे आश्वासन देण्यात आले. त्यानुसार, बाळू हातेकर यांना सायन रुग्णालयात तर त्यांची पत्नी आणि मुलीला पनवेल रुग्णालयात दाखल करण्यात आले. IND vs ENG : टीम इंडियाच्या या दोन क्रिकेटपटूंवर नाराज झाले सुंदरचे वडील या अपघातात बाळू हातेकर यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली असून अनेक ठिकाणी नसा तुटल्या होत्या. दरम्यान सायन हॉस्पिटल मध्ये दोन महिन्यात ऑपरेशन आणि इतर उपचार करून त्यांना 26 जानेवारीला डिस्चार्ज देण्यात आले . मात्र, घरी आणल्यानंतर त्याच्या जखमेतून रक्तस्त्राव होऊ लागला आणि त्याची प्रकृती ढासळली. एसटी महामंडळ उपचार करण्यास  प्रतिसाद देत नसल्याने आता उपचारा अभावी पाय कापण्याची वेळ हातेकर यांच्यावर आली आहे. मला शासनाने बरं करावं, बरं झाल्यावर माझ्या मेहनतीने मी कुटुंबाचे पोषण करीन. मात्र, सध्या या परिस्थितीत दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. अपघात झाला त्याच दिवशी मृत्यू आला असता तर इतक सोसावं लागलं नसतं असे बाळू हातेकर निराश होऊन सांगतात. या अपघातात हातेकर यांची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाल्या होत्या. मात्र अजूनही दोघींना उभं ही राहता येत नाही. त्यामुळे हातेकर यांच्या पत्नीला सगळी कामं घरात रांगत करावी लागतात. माझ्या पतीला उपचार मिळाले नाहीत तर पाय कापावा लागेल, प्रसंगी मृत्यू देखील होईल. त्यामुळे  पुन्हा रुग्णालयात दाखल करून पतीला उपचार मिळावेत ,अशी मागणी हातेकर यांच्या पत्नी लक्ष्मी हातेकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. अकोला शहरातील 'ती' भयावह मध्यरात्र; चोरी केल्याच्या संशयावरुन दगडाने ठेचून हत्या सध्या मित्र परिवार हातेकर यांचा कुटुंबाला मदत करत आहेत. मात्र आम्ही किती दिवस मदत करणार,एस टी महामंडळाच्या चुकीमुळे त्यांच्यावर ही वेळ आली असताना उलट एसटी महामंडळच हातेकर यांच्याकडे पैशाचा तगादा लावत असल्याचे त्यांचे सहकारी संदीप कांबळे यांचे म्हणणे आहे. तर बाळू हातेकर यांनी सायन रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून उपचारासाठी लागणारी औषधे मोफत मिळाली. मात्र त्यांची बिलं एस.टी महामंडळात सादर करून त्याचे पैसे त्यांनी घेतले. मात्र आमच्या बिल तपासणी दरम्यान ते समोर आल्याचे एस.टी महामंडळाचे अधिकारी बी.देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, बाळू हातेकर यांची प्रकृती खालावल्यानंतर दोन वेळा त्यांना सायन  हॉस्पिटलला दाखल करण्यासाठी नेण्यात आले होते. मात्र त्यांनी हातेकर यांना दाखल करून घेतलॆ नाही.आता हातेकर यांना लवकरात लवकर उपचार मिळाले नाहीत तर मात्र त्यांच्या जीवावर बेतणार आहे.त् यामुळे राज्य सरकारने पर्यायाने परिवहन विभागाने यात लक्ष देऊन हातेकर यांच्या प्रकरणात लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Amb, India, Mumbai pune expressway, Road accident, Shocking news, St bus accident, अंबरनाथ, एसटी बस

पुढील बातम्या