जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Dhule ZP Election Result: भाजपला धक्का, कापडणे गटात राष्ट्रवादीच्या किरण पाटील यांचा विजय

Dhule ZP Election Result: भाजपला धक्का, कापडणे गटात राष्ट्रवादीच्या किरण पाटील यांचा विजय

Dhule ZP Election Result: राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपची विजयी घौडदोड रोखली.

  • -MIN READ
  • Last Updated :

धुळे, 6 ऑक्टोबर : धुळे जिल्हा परिषदेत (Dhule Zilla Parishad) महाविकास आघाडीला मोठं यश प्राप्त झालं आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करत मविआने (MVA) कापडणे गटात (Kapadane gat) बाजी मारली आहे. तुल्यबळ लढतीत भाजपच्या रामकृष्ण खलाणे यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादीच्या किरण पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) या विजयामुळे भाजपला मोठा झटका बसला असल्याचं बोललं जात आहे. शिरपूर 6 गणात भाजप विजयी - 8 पैकी 2 जागांवर भाजपं यापूर्वीच बिनविरोध - अमरिषभाई पटेल यांच्या वर्चस्वातील हा भाग - सर्व 8 जागांवर भाजपचा जोरदार विजय शिरपूर तालुक्यातील सर्व सहा गणात भाजपाचे वर्चस्व मिळवल्याचं पहायला मिळत आहे. आमदार अमरीश पटेल यांनी आपलं वर्चस्व कायम राखत सर्व गण जिंकले आहेत. धुळे जिल्हा परिषदेच्या 15 गट, पंचायत समितीच्या 30 जागांसाठी पोटनिवडणूक जिल्हा परिषद - 15 गट पंचायत समिती जागा - 30 जिल्हा परिषदेची 1 जागा बिनविरोध पंचायत समितीच्या 2 जागा बिनविरोध प्रमुख लढत - भाजप विरुद्ध महाविकास आघाडी 15 पैकी जिल्हा परिषदेची 1 जागा तर पंचायत समितीच्या 2 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित जिल्हा परिषदेच्या 14 आणि पंचायत समितीच्या 28 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली. धुळ्यात गेल्या वेळचं चित्र काय होतं ? गेल्या अनेक वर्षांपासून काँगेसचा बालेकिल्ला असलेल्या धुळे जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच भाजप ने बहुमताने सत्ता काबीज केली होती. गेल्या निवडणुकीत 15 पैकी 11 जागांवर भाजपचे उमेदवार निवडणून आले होते तर काँग्रेसच्या 2 तर शिवसेनेच्या 2 जागा होत्या. दरम्यान यावेळेस भाजपच्या जागा वाढतात की घटतात हे पाहावे लागणार आहे. नंदुरबारमध्ये भाजपला झटका, काँग्रेसच्या हेमलता शितोळे विजयी नंदुरबारमध्ये काँग्रेसने खाते उघडले असून म्हसावद गटातून काँग्रेसच्या हेमलता शितोळे विजयी झाल्या आहेत. हेमलता शितोळे यांनी भाजप उमेदवार शशिकांत पाटील यांचा पराभव केला आहे. हेमलता शितोळे यांनी 1923 मतांनी विजय मिळवला आहे. प्राथमिक माहितीनुसार जिल्हानिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी धुळे- 60, नंदुरबार- 65, अकोला- 63, वाशीम- 65, नागपूर- 60 आणि पालघर- 65. एकूण सरासरी- 63 टक्के नागपूर जिल्हा परिषदेतील 16 व पंचायत समितीच्या 31 जागांसाठी पोटनिवडणूक झेडपी सर्कल वडोदा अवंतिका लेकुरवाळे - काँग्रेस अनिता चिकटे - भाजप गोधनी रेल्वे कुंदा राऊत - काँग्रेस विजय राऊत - भाजप गुमथळा दिनेश ढोले - काँग्रेस अनिल निदान - भाजप डिगडोह रश्मी कोटगुले - एनसीपी सुचिता ठाकरे - भाजप केळवद सुमित्रा कुंभारे - काँग्रेस संगीता मुलमुले - भाजप येनवा समीर उमप - शेकाप निलेश धोटे - भाजप 1) सावरगाव देवका बोडखे (राष्ट्रवादी) देवका बोडखे (राष्ट्रवादी) पार्वती काळबांडे (भाजप) अंजली सतीश शिंदे (अपक्ष) 2) भिष्णूर पूनम जोध (राष्ट्रवादी), प्रवीण जोध (राष्ट्रवादी) नितीन सुरेश धोटे (भाजप) संजय ढोकणे (शिवसेना) 3) येनवा समीर उमप (शेकाप) समीर उमप (शेकाप) नीलेशकुमार धोटे (भाजप) 4) पारडसिंगा चंद्रशेखर कोल्हे (राष्ट्रवादी) शारदा कोल्हे (राष्ट्रवादी) मीनाक्षी सरोदे (भाजप) 5) वाकोडी ज्योती शिरसकर (काँग्रेस) ज्योती शिरसकर (काँग्रेस) आयुषी धापके (भाजप) 6) केळवद मनोहर कुंभारे (काँग्रेस) सुमित्रा कुंभारे (काँग्रेस) संगीता मुलमुले (भाजप) 7) करंभांड अर्चना भोयर (काँग्रेस) अर्चना भोयर (काँग्रेस) प्रभा कडू (भाजप) संजीवनी गोमकाळे (शिवसेना) 8) बोथिया पालोरा कैलास राऊत (काँग्रेस) कैलास राऊत (काँग्रेस) नकुल बरबटे (राष्ट्रवादी) लक्ष्मण केणे (भाजप) देवानंद वंजारी (शिवसेना) 9) गुमथळा अनिल निदान (भाजप) अनिल निदान (भाजप) दिनेश ढोले (काँग्रेस) 10) वडोदा अवंतिका लेकुरवाळे (काँग्रेस) अवंतिका लेकुरवाळे (काँग्रेस) अनिता चिकटे (भाजप) सोनम करडभाजने (प्रहार) 11) अरोली योगेश देशमुख (काँग्रेस) योगेश देशमुख (काँग्रेस) सदानंद निमकर (भाजप) 12) गोधनी रेल्वे ज्योती राऊत (काँग्रेस) कुंदा राऊत (काँग्रेस) विजय राऊत (भाजप) 13) निलडोह राजेंद्र हरडे (भाजप) राजेंद्र हरडे (भाजप) संजय जगताप (काँग्रेस) 14) इसासनी अर्चना गिरी (भाजप) अर्चना गिरी (भाजप) गीता हिरणखेडे (राष्ट्रवादी) संगीता कौरती (शिवसेना) 15) डिगडोह सुचिता ठाकरे (राष्ट्रवादी) सुचिता ठाकरे (भाजप) रश्मी कोटगुले (राष्ट्रवादी 16) राजोना बालू ठवकर(भाजप) बालू ठवकर भाजप अरुण हटवार( काँग्रेस) धुळे जिल्हा परिषदेच्या 15 गट, पंचायत समितीच्या 30 जागांसाठी पोटनिवडणूक जिल्हा परिषद - 15 गट पंचायत समिती जागा - 30 जिल्हा परिषदेची 1 जागा बिनविरोध पंचायत समितीच्या 2 जागा बिनविरोध प्रमुख लढत - भाजप विरुद्ध महाविकास आघाडी 15 पैकी जिल्हा परिषदेची 1 जागा तर पंचायत समितीच्या 2 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित जिल्हा परिषदेच्या 14 आणि पंचायत समितीच्या 28 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: dhule , election
  • First Published :
जाहिरात
जाहिरात