जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / विवाहितेकडं लग्नाची मागणी; नकार येताच आरोपीचं महिलेसोबत भयानक कांड, धाराशिव हादरलं

विवाहितेकडं लग्नाची मागणी; नकार येताच आरोपीचं महिलेसोबत भयानक कांड, धाराशिव हादरलं

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ Osmanabad,Osmanabad,Maharashtra
  • Last Updated :

धाराशिव, 30 एप्रिल, बालाजी निरफळ :  लग्नास नकार दिल्यामुळे विवाहित महिलेच्या डोक्यात व छातीत बंदुकीने गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे शिवारात घडली आहे. याप्रकरणी आरोपी लक्ष्मण नागणे याच्या विरोधात भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून लग्नाची मागणी  भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे शिवारात शेतात बुधवारी सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आसता तपासात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय.  लक्ष्मण नागणे याने गावातील एका 26 वर्षीय विवाहित महिलेला आपल्या शेतात बोलावून घेतले व तिच्याकडे लग्नाची मागणी केली. मात्र महिलेने लग्नास नकार दिला. नकार देताच हत्या   लग्न करण्यास नकार  दिल्याच्या रागातून लक्ष्मण नागणे याने  या महिलेच्या छातीत व डोक्यात गोळ्या झाडल्या. यामध्ये ती महिला जागीच ठार झाली. यानंतर लक्ष्मण नागणे याने या महिलेचा मृतदेह साडीत गुंडाळून शेतात फेकून दिला. भूम पोलिसांनी लक्ष्मण नागणे यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल  केला आहे. लक्ष्मण नागरे सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात