जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Crime News: एकनाथ लोमटे महाराजांचा आणखी एक कारनामा; आता राज्य शासनाला 1 कोटीचा गंडा

Crime News: एकनाथ लोमटे महाराजांचा आणखी एक कारनामा; आता राज्य शासनाला 1 कोटीचा गंडा

एकनाथ लोमटे महाराजांचा आणखी एक कारनामा

एकनाथ लोमटे महाराजांचा आणखी एक कारनामा

गावात पूर्वी झालेल्या विकास कामावरच पुन्हा निधी मंजूर करुन राज्यशासनाला एक कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

बालाजी निरफळ, धाराशिव 19 जुलै : महिला भाविकाचा विनयभंग प्रकरणात राज्यभर चर्चेत आलेल्या मलकापूर येथील स्वयंघोषित संत एकनाथ लोमटे महाराजाचा आणखी एक करणामा उघड झाला आहे. गावात पूर्वी झालेल्या विकास कामावरच पुन्हा निधी मंजूर करुन राज्यशासनाला एक कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदरील प्रकरणात गाव विकासासाठी निधी आणतो असं म्हणून एकनाथ लोमटे यांनी ग्रामपंचायतीच्या कागदपत्रांचा गैरवापर केल्याचं पंचायत समिती चौकशीत उघडकीस आलं आहे. दरम्यान या प्रकरणाची गावकऱ्यांनी पोलिसांत तक्रार दिली असून प्रकरणाचा तपास सुरू होताच लोमटे महाराज पुन्हा फरार झाला आहे. राज्यभरातील लोकांना जडी-बुटी देत असाध्य आजार बरे करण्याचा दावा करणारे तसेच संतती प्राप्तीसाठी प्रसिध्द एकनाथ लोमटे महाराज यांना गेल्या वर्षी जुलै महिन्यात महिला भाविकाच्या विनय भंगाच्या प्रकरणात अटक झाली होती. आता एकनाथ लोमटे महाराज यांनी ग्रामपंचायत प्रशासनास राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयालयाच्या शिफारस पत्रावरुन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मार्च एंडच्या विकास कामाच्या गडबडीत मलकापूर येथील ग्रामपंचायतचे कोऱ्या कागदपत्रांचा गैरवापर करुन जुन्याच झालेल्या विकास कामावर नव्याने एक कोटी दहा लाख निधी मंजूर करुन आणला होता. सदरील प्रकार ग्रामपंचायतच्या निदर्शनास आल्यानंतर ग्रामपंचायतने संबंधित विभागाला निधी रद्द करण्याचे पत्र दिले आणि दत्त मंदिर संस्थान मठ परिसरातील कामे रद्द करण्यात आली आहेत. सदरील प्रकरणाची चौकशी करुन संबंधितावर कारवाई करण्यात यावी म्हणून मलकापूरचे ग्रामस्थ सुंदर लोमटे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या सह्यांचे कोरे लेटर हेड वापरुन बनावट कागदपत्रांचा गैरवापर करुन आधीच झालेल्या कामावर पुन्हा निधी मंजूर करुन आणल्याचे पंचायत समिती चौकशी अहवालातून समोर आले आहे .त्यानुसार निधी मंजूर करुन आणणाऱ्या दत्त मंदिर संस्थानचे एकनाथ लोमटे महाराज यांनी राज्य शासनाला एक कोटी दहा लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदरील निधी रद्द करण्यात आला असला तरी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या चौकशी अहवालानुसार संबंधितावर गुन्हे नोंद करण्यात यावे म्हणून सुंदर लोमटे यांनी येरमाळा पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे. दरम्यान संबंधित प्रकरणात न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधींनी पंचायत समितीचे अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता या प्रकरणात चौकशी सुरू असून लवकरच गुन्हा दाखल होईल, असे सांगत कॅमेऱ्यासमोर मात्र बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात