नागपूर 24 ऑक्टोंबर : भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या विदर्भावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी भिस्त होती. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विदर्भ भाजपला धक्का देऊ शकतो. भाजपला 2014ची स्थिती गाठण्यासाठीही दमछाक करावी लागण्याची शक्यता आहे. तर अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसू शकतो. भाजपचे मंत्री आणि यवतमाळचे उमेदवार मदन येरावार हे पिछाडीवर आहेत. दुपारी 1 वाजेपर्यंत विदर्भातल्या 62 जागांपैकी भाजप आणि शिवसेना 33, काँग्रेस-राष्ट्रवादी 17 इतर 09 तर वंचित 1 जागांवर आघाडीवर आहे. विदर्भात कोण किती जागांवर पुढे? भाजप : २६ शिवसेना : ०७ काँग्रेस : १६ राष्ट्रवादी : ०४ अपक्ष : ०७ वंचित : ०१ स्वतंत्र भारत पक्ष :०१ एकूण जागा : ६२ 2014 चा विचार केला तर भाजपला तब्बल 13 जागांचा फटका बसू शकतो तर काँग्रेसला 1 जागेचा आणि राष्ट्रवादीला 5 जागांचा फायदा होण्याची शक्यता आहे. विदर्भातून 50 पेक्षा जास्त जागा मिळविण्याचं भाजपचं गणित होतं. यामुळे भाजपचं गणित बिघडलं असून स्वबळावर सत्ता आणण्याचं स्वप्न भंगणार आहे. वंचित खातं उघडणार विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाची सर्वाधिक चर्चा झाली तो पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी. वंचितकडे जिंकण्याची ताकद नाही मात्र तो पक्ष आघाडीचे उमेदवार पाडू शकतो असं बोललं जातं होतं. मात्र राज्यात पहिल्यांदाच वंचित आपलं खातं उघडण्याची शक्यता असून विदर्भातून वंचितच्या उमेदवार आघाडीवर आहेत. लोकसभेत वंचितची प्रचंड चर्चा झाली होती. आणि त्यामुळे आघाडीच्या 10 ते 15 उमेदवारांचा पराभव झाला असं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे विधानसभेत काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. विदर्भात अकोला जिल्हा हा प्रकाश आंबेडकरांचा गड मानला जातो. त्याच जिल्ह्यातल्या मूर्तीजापूर इथून वंचितच्या उमेदवार प्रतिभा अवचार या आघाडीवर असून दुपारी साडेबारा वाजेपर्यंत त्यांना 4 हजारांची आघाडी मिळाली होती.
Live Result Vidarbha :विदर्भातून भाजपच्या ‘या’ दिग्गज मंत्र्यांना धक्का बसणार?
भाजपचे विद्यमान आमदार हरिश पिंपळे यांना त्यांनी कडवी झुंझ दिली. भाजपमध्ये असलेली पिंपळे यांच्याविरुद्धची नाराजी, बंडखोरी याचा फटका आमदार पिंपळे यांना बसला असून वंचितच्या उमेदवार अवचार यांना फायदा झाला आहे. भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या विदर्भावर पक्षाची मोठी भिस्त होती. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 2014ची स्थिती गाठण्यासाठीही दमछाक करावी लागण्याची शक्यता आहे. तर अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसू शकतो. भाजपचे मंत्री आणि यवतमाळचे उमेदवार मदन येरावार हे सहाव्या फेरीअखेर 2 हजार 473 मतांनी पिछाडीवर होते तर काँग्रेसचे बाळासाहेब मंगुळकर हे आघाडीवर आहेत. पक्षात असेली नाराजी, बंडखोरी याचा फटका मदन येरावार यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. दुपारी 12 वाजेपर्यंत विदर्भातल्या 62 जागांपैकी भाजप 26, शिवसेना 07, काँग्रेस 16 तर राष्ट्रवादी 04 जागांवर आघाडीवर आहे.

)







