मुंबई, 25 सप्टेंबर : वेदांता-फॉक्सकॉन हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या सरकारवर टीका केली, तर सरकारने तत्कालिन महाविकासआघाडीच्या उदासिनतेमुळे हा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्याचा आरोप केला. वेदांता फॉक्सकॉननंतर आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ‘वेदांत-फॉक्सकॉन व बल्क ड्रग पार्क या दोन प्रकल्पांपाठोपाठ आता महाराष्ट्राला मेडिसीन डिवाइस पार्क योजनेला देखील मुकावे लागले आहे. उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळ असताना महाराष्ट्रापासून आणखी एक प्रकल्प हिरावून घेण्यात आला आहे. याबद्दल सत्ताधाऱ्यांना माहिती आहे का?’ असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.
वेदांत-फॉक्सकॉन व बल्क ड्रग पार्क या दोन प्रकल्पांपाठोपाठ आता महाराष्ट्राला मेडिसीन डिवाइस पार्क योजनेला देखील मुकावे लागले आहे.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 25, 2022
उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळ असताना महाराष्ट्रापासून आणखी एक प्रकल्प हिरावून घेण्यात आला आहे.
याबद्दल सत्ताधाऱ्यांना माहिती आहे का? https://t.co/zrXmSUTdDK
LIVE | Media interaction in #Pune https://t.co/ZS0aPTSQok
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 25, 2022
आदित्य ठाकरे यांच्या या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला त्यांना एक विचारायचे आहे, मेडिकल डिव्हाईस पार्क महाराष्ट्रात येणार होता, याचा एक चिठीवर पुरावा तरी तुम्ही दाखवणार का? मनात येईल ते बोलायचं अडीच वर्षे होते थोडे थोडके नव्हते. अडीच वर्षात काहीच केलं नाही, अडीच वर्ष केवळ केंद्र सरकारला शिव्या द्यायच्या एवढं एकमेव काम केलं आणि आता वाटेल ते मनात येईल ते बोलतात. माझा त्यांना सवाल आहे, आता एक चिठ्ठी तर दाखवा महाराष्ट्रात मेडिकल डिवाइस प्रकल्प येणार होता. रोज रेटून खोटं बोलायचं अशाने महाराष्ट्र पुढे जाणार नाही,’ असा पलटवार फडणवीस यांनी केला आहे.