जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यामागे कोणाचा हात? फडणवीसांनी दिलं उत्तर

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यामागे कोणाचा हात? फडणवीसांनी दिलं उत्तर

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यामागे कोणाचा हात? फडणवीसांनी दिलं उत्तर

भाजपकडे जास्त आमदार असल्याने भाजपचाच मुख्यमंत्री होईल अशी चर्चा सुरू असताना अचानक एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याने राज्यातील जनतेसह सर्वच क्षेत्रातील जाणकारांच्या भुवया उंचावल्या होत्या.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 06 नोव्हेंबर : मागच्या चार महिन्यांपूर्वी शिवसेनेत उभी फुट पडल्याने महाविकास आघाडीची सत्ता गेली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत युती सरकारची स्थापना केली. दरम्यानच्या काळात भाजपकडे जास्त आमदार असल्याने भाजपचाच मुख्यमंत्री होईल अशी चर्चा सुरू असताना अचानक एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याने राज्यातील जनतेसह सर्वच क्षेत्रातील जाणकारांच्या भुवया उंचावल्या होत्या.

जाहिरात

भाजपची ही नवी चाल पुढच्या राजकारणात नेमकं काय घडवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री मुख्यमंत्री करण्याचा मूळ निर्णय कोण घेतला यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका माध्यमसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट सांगितलं.

हे ही वाचा :  अंधेरी पोटनिवडणुकीचा पहिला कल हाती, ऋतुजा लटके आघाडीवर

यावेळी फडणवीस म्हणाले की, सत्तांतर घडत असताना सर्व घडामोडी क्रिकेटच्या टी-२० सामन्याप्रमाणे घडत होत्या. जसजसा वेळ पुढे जात होता तस तसे कधी काय निकाल लागेल, याचा अंदाज कोणालाच बांधता येत नव्हता. परिस्थितीनुसार गोष्टी बदलत गेल्या. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय माझ्या सहमतीने झाला. यापुढे जाऊन मी असं म्हणेन की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझाच होता. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर मी जबाबदारीने हे वक्तव्य करतोय.

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावं, हा माझा प्रस्ताव होता. या प्रस्तावानंतर आमच्या वरिष्ठ नेत्यांनी याला मान्यता दिली. त्यामुळे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणं, हा माझ्यासाठी धक्का नव्हता. पण मी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारावी, हा निर्णय माझ्यासाठी धक्का होता.

आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जेव्हा माझ्याशी चर्चा केली, तेव्हा ते या निर्णयावर ठाम होते. त्यांनी ज्याप्रकारे मला समजावून सांगितलं, त्यामध्ये पार्टीचं हित होतं. जेव्हा मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत होतो, तेव्हा माझ्या मनात विविध प्रकारचे विचार सुरू होते. ते चेहऱ्यावरही स्पष्टपणे दिसत होते, ही बाब मी लपवणार नाही. पण या निर्णयानंतर महाराष्ट्र आणि देशातून मला प्रचंड पाठिंबा मिळाला.

जाहिरात

हे ही वाचा :  अजित पवार मुख्यमंत्री होणार का? शिंदे गटाच्या नेत्याने उडवली खिल्ली, म्हणाले…

मुख्यमंत्री बनून माझं कर्तृत्व जेवढं वाढले असते, तेवढंच उपमुख्यमंत्री बनून माझे कर्तृत्व वाढलेले आहे. आम्ही जे परिवर्तन केले आहे, ते महाराष्ट्र आणि देशाच्या हिताचे आहे, हे लोकांना अल्पावधित समजले आहे. जेव्हा तुम्ही असे परिवर्तन करत असता, तेव्हा तुम्हाला असे कठोर निर्णय घ्यावे लागतात. तेव्हा घेतलेल्या निर्णयावर आता पूर्णपणे समाधानी आहे, असेही फडणवीस म्हणाले.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात