• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • Deglur Assembly bypolls result: काँग्रेसची दिवाळी दणक्यात, देगलूर पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर विजयी, भाजप पराभूत

Deglur Assembly bypolls result: काँग्रेसची दिवाळी दणक्यात, देगलूर पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर विजयी, भाजप पराभूत

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर यांचा दणदणीत विजय, सुभाष साबणे पराभूत

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर यांचा दणदणीत विजय, सुभाष साबणे पराभूत

Deglur Assembly bypolls result: देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे.

  • Share this:
नांदेड, 2 नोव्हेंबर : नांदेड जिल्ह्यातील (Nanded) देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल (Deglur assembly election bopolls result) समोर आला आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांनी या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. जितेश अंतापूरकर यांच्या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. शेवटच्या फेरीअखेरीस जितेश अंतापूरकर यांना 108840 मते मिळाली तर भाजपच्या सुभाष साबणे (Subhash Sabane) 66907 मते मिळाली. यामुळे ही निवडणूक काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांनी 41933 मतांनी जिंकली आहे. 30वी आणि शेवटची फेरी जितेश अंतापूरकर - 108840 मते सुभाष साबणे - 66907 मते 41933 मतांनी जितेश अंतापूरकर विजयी 29व्या फेरीनंतर जितेश अंतापूरकर - 107329 मते सुभाष साबणे - 65772 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 41557 मतांनी आघाडीवर 28व्या फेरीनंतर जितेश अंतापूरकर - 104373 मते सुभाष साबणे - 63414 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 40959 मतांनी आघाडीवर 27व्या फेरीनंतर जितेश अंतापूरकर - 100773 मते सुभाष साबणे - 61354 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 39419 मतांनी आघाडीवर 26 व्या फेरीनंतर जितेश अंतापूरकर - 97157 मते सुभाष साबणे - 59031 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 38126 मतांनी आघाडीवर 25व्या फेरीनंतर जितेश अंतापूरकर - 94221 मते सुभाष साबणे - 56959 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 37262 मतांनी आघाडीवर 24व्या फेरीनंतर जितेश अंतापूरकर - 90421 मते सुभाष साबणे - 54626 मते उत्तम इंगोले - 10201 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 35795 मतांनी आघाडीवर 23व्या फेरीनंतर जितेश अंतापूरकर - 86850 मते सुभाष साबणे - 52425 मते उत्तम इंगोले - 9841 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 34425 मतांनी आघाडीवर 22व्या फेरीनंतर जितेश अंतापूरकर - 82690 मते सुभाष साबणे - 50518 मते उत्तम इंगोले - 9191 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 32172 मतांनी आघाडीवर 21व्या फेरीअखेरीस जितेश अंतापूरकर - 78923 मते सुभाष साबणे - 48657 मते उत्तम इंगोले - 8856 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 30266 मतांनी आघाडीवर 20व्या फेरीनंतर जितेश अंतापूरकर - 74821 मते सुभाष साबणे - 47058 मते उत्तम इंगोले - 8019 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 27763 मतांनी आघाडीवर 19वी फेरी जितेश अंतापूरकर - 70675 मते सुभाष साबणे - 45452 मते उत्तम इंगोले - 7668 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 25223 मतांनी आघाडीवर अठरावी फेरी जितेश अंतापूरकर - 66979 मते सुभाष साबणे - 43101 मते उत्तम इंगोले - 7372 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 23878 मतांनी आघाडीवर सतराव्या फेरी नंतर जितेश अंतापूरकर - 63537 मते सुभाष साबणे - 40835 मते उत्तम इंगोले - 6953 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 22702 मतांनी आघाडीवर सोळावी फेरी जितेश अंतापूरकर - 60116 मते सुभाष साबणे - 39034 मते उत्तम इंगोले - 6388 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 21082 मतांनी आघाडीवर पंधरावी फेरी जितेश अंतापूरकर - 56409 मते सुभाष साबणे - 37229 मते उत्तम इंगोले - 5794 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 19180 मतांनी आघाडीवर तेराव्या फेरी अखेरीस जितेश अंतापूरकर - 52599 मते सुभाष साबणे - 34857 मते उत्तम इंगोले - 5059 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 17742 मतांनी आघाडीवर बारावी फेरी जितेश अंतापूरकर - 44344 मते सुभाष साबणे - 30169 मते उत्तम इंगोले - 4464 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 14175 मतांनी आघाडीवर अकरावी फेरी जितेश अंतापूरकर - 40523 मते सुभाष साबणे - 27943 मते उत्तम इंगोले - 4047 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 12580 मतांनी आघाडीवर दहाव्या फेरीनंतर जितेश अंतापूरकर - 36592 मते सुभाष साबणे - 25623 मते उत्तम इंगोले - 3560 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 10969 मतांनी आघाडीवर नवव्या फेरीअखेरीस महावी - जितेश अंतापूरकर - 33068 भाजप- सुभाष साबणे - 22486 वंचित- उत्तम इंगोले - 3022 कॉंग्रेसचे जितेश अंतापूरकर 10582 मतांनी आघाडीवर आठव्या फेरीअखेरीस जितेश अंतापूरकर - 29375 मते सुभाष साबणे - 19873 मते उत्तम इंगोले - 2668 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 9502 मतांनी आघाडीवर सातव्या फेरीअखेरीस जितेश अंतापूरकर - 25376 मते सुभाष साबणे - 17164 मते उत्तम इंगोले - 2257 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 8212 मतांनी आघाडीवर सहाव्या फेरीअखेरीस जितेश अंतापूरकर - 22332 मते सुभाष साबणे - 14564 मते उत्तम इंगोले - 1840 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 7768 मतांनी आघाडीवर पाचव्या फेरीअखेर जितेश अंतापूरकर - 18245 मते सुभाष साबणे - 12077 मते उत्तम इंगोले - 1505 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 6168 मतांनी आघाडीवर चौथ्या फेरीअखेर जितेश अंतापूरकर - 14544 सुभाष साबणे - 9975 उत्तम इंगोले - 1225 काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 4557 मतांनी आघाडीवर तिसरी फेरी तिसऱ्या फेरी अखेर काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना 10712 मते, तर भाजपच्या सुभाष साबणे यांना 7448 मते जितेश अंतापूरकर - 10712 मते सुभाष साबणे - 7448 मते उत्तम इंगोले - 873 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 3264 मतांनी आघाडी दुसरी फेरी काँग्रेसचे जितेश अंतापूरकर - 7295 मते भाजपचे सुभाष साबणे - 5001 मते वंचित बहुजन आघाडीचे उत्तम इंगोले - 769 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 2293 मतांनी आघाडीवर पहिल्या फेरी अखेर काँग्रेसचे जितेश अंतापूरकर - 4216 मते भाजपचे सुभाष साबणे - 2592 मते वंचित बहुजन आघाडीचे उत्तम इंगोले - 320 मते काँग्रेसचे जितेश अंतापूरकर - 1624 मतांनी आघाडीवर 14 टेबलवर ही मोजणी 30 फेऱ्यांची झाली. काँग्रेसचे नेते दिवंगत रावसाहेब अंतापुरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपकडून माजी आमदार सुभाष साबणे (Subhash Sabane) यांना उमेदवारी देण्यात आली होती. मुख्य लढत जितेश अंतापूरकर आणि सुभाष साबणे यांच्यात झाली आहे. ही निवडणूक काँग्रेसनेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. तर भाजपाने देखील ही जागा जिंकण्यासाठी जोर लावला होता. या निवडणुकीत 64.95 % इतकं मतदान झालं होतं. एकूण 2 लाख 98 हजार 535 मतदारांपैकी 1 लाख 90 हजार 800 इतकं मतदान झालं. एकूण 12 उमेदवार रिंगणात होते. मात्र महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशीच लढत झाली. वंचित आघाडीने देखील आपला उमेदवार दिला होता. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. आता या जागेवर पोटनिवडणूक पार पडली आहे. काँग्रेसने ही जागा पुन्हा मिळवण्यासाठी जोरदार तयारी करत मैदानात उतरले होते. तर तिकडे विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सुद्धा या जागेवर विजय मिळवण्यासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. यापूर्वी देगलूर बिलोली मतदारसंघात कोणाचं प्राबल्य? 2009 च्या निवडणुकीत काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर विजयी 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुभाष साबणे यांनी मारली बाजी 2019 मध्ये पुन्हा रावसाहेब अंतापूरकर यांनी विजय मिळवला नांदेड हा अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या निवडणुकीत अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर ही जागा मिळवण्यासाठी भाजपनेही कंबर कसली होती.
Published by:Sunil Desale
First published: