जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / हेलिकॉप्टरने एंट्री अन् 12 गाड्यांचा ताफा, सूनबाईचे स्वागत पाहून अख्खं गाव पाहातच राहिलं

हेलिकॉप्टरने एंट्री अन् 12 गाड्यांचा ताफा, सूनबाईचे स्वागत पाहून अख्खं गाव पाहातच राहिलं

हेलिकॉप्टरने एंट्री अन् 12 गाड्यांचा ताफा, सूनबाईचे स्वागत पाहून अख्खं गाव पाहातच राहिलं

जळगावमधील विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

  • -MIN READ Jalgaon,Jalgaon,Maharashtra
  • Last Updated :

नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 10 फेब्रुवारी : हौसेला मोल नसते असे म्हटले जाते. मात्र, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे असाच प्रकार पाहायला मिळाला आहे. लग्नाची धामधूम सूरू आहे. यात अमळनेरातील घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. बिल्डर सरजू गोकलाणी यांनी आपल्या लाडक्या सुनेला चक्क हेलिकॉप्टरवर आणले आणि तिचे जंगी स्वागत केले. हे पाहून सूनदेखील भारावली होती. लग्नात हेलिकॉप्टरवर सून आणल्याच्या या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. सर्वसाधारणपणे लग्न समारंभात वर पक्षाची सरबराई केली जाते. त्यांच्या परिवाराचा मानपान केला जातो. मात्र, मुलगा मुलगी समान मानून अद्यापही एकत्र कुटुंबात नांदणाऱ्या गोकलानी परिवाराचे प्रमुख बिल्डर सरजू गोकलाणी यांनी आपल्या सुनेला खऱ्या अर्थाने घरची लक्ष्मी मानून तिला अहमदनगर येथून हेलिकॉप्टरमधून आणले. गोकलानी यांचा मुलगा आशिष याचा विवाह नगर येथील आईस्क्रीमचे उद्योगपती चंदानी परिवाराची सिमरन हिच्याशी होत आहे. सरजू गोकलाणी यांनी खास पुण्याहून नगर आणि नगरहून वधूला घेऊन अमळनेरला हेलिकॉप्टर आणले. अमळनेर येथे आल्यावर आशिष त्यात बसला आणि पुन्हा हेलिकॉप्टरने टेकअप घेऊन मंगळ ग्रह मंदिरावर फुलांचा वर्षाव करून परत प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर उतरले. नववधुच्या स्वागतासाठी संपूर्ण गोकलानी परिवारासह नातेवाईक प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर जमला होता. त्यांनतर 13 वाहनांच्या ताफ्यासह गोकलानी परिवाराने वधूला घरी नेले. नववधुची गाडी स्वतः सासरे सरजू गोकलानी यांनी चालवली. पुढे आणि मागे काळ्या गाड्या होत्या आणि मध्ये पांढऱ्या गाड्या होत्या. हेही वाचा -  Vande Bharat : मुंबई ते सोलापूर आणि शिर्डी; कसा असेल वंदे भारत एक्सप्रेसचा रुट आणि तिकिट दर हवाई सफारी करून कसे वाटले या प्रश्नवर नववधूने आनंद व्यक्त करत हे माझे सासरे नाहीत तर वडीलच आहेत, अशी प्रतिक्रिया दिली. हेलिकॉप्टरच्या खाली उतरताच फुलांच्या वर्षावात, संगीत नृत्य करत वधूवराचे स्वागत करण्यात आले. यावेळी नववधुचे स्वागत पाहण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली होती. तसेच पोलिसांना विशेष बंदोबस्त ठेवावा लागला होता. सुमारे चार ते पाच लाख रुपये फक्त नववधूच्या स्वागतासाठी खर्च करण्यात आले, अशी माहिती आहे. या अनोख्या विवाहसोहळ्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात