मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Ratnagiri Jagbudi River : मुसळधार पावसामुळे आले महाकाय संकट, रत्नागिरीकरांनो, काळजी घ्या, नदीच्या किनाऱ्यावर जाऊ नका!

Ratnagiri Jagbudi River : मुसळधार पावसामुळे आले महाकाय संकट, रत्नागिरीकरांनो, काळजी घ्या, नदीच्या किनाऱ्यावर जाऊ नका!

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी सलग पाचव्यांदा ओलांडली.

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी सलग पाचव्यांदा ओलांडली.

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी सलग पाचव्यांदा ओलांडली.

रत्नागिरी, 14 जुलै : मागच्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोक्याची (Ratnagiri Jagbudi River) पातळी सलग पाचव्यांदा ओलांडली. दरम्यान आज (दि.14) सकाळपासून पावसाचा जोर कमी झाल्याने नदीची पातळी एक मीटर ने कमी झाली. मात्र जगबुडी नदीपात्रातील लहान लहान बेटांवर सकाळी महाकाय मगरीचे दर्शन झाले. 

पूर प्रवण भाग असलेल्या खेड मधील अलसुर गावानजीक लोक वस्ती पासून अगदी जवळ असलेल्या ठिकाणी पाच ते सहा महाकाय मगरी बेटांवर निवांत बसलेल्या नागरिकांनी पाहिल्या, जगबुडी नदी वारंवार धोक्याची पातळी ओलांडत आहे. पावसाचा जोर वाढला आणि नदीचे पाणी गावात शिरले तर पाण्यासोबत याच महाकाय मगरी लोकवस्तीत शिरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. वन विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी देखील पूर पवन क्षेत्रातील ग्रामस्थांनी केली आहे.

हे ही वाचा : LIVE Updates : राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढला; पालघर, पुणे, कोल्हापूर, साताऱ्यात रेड अलर्ट

जगबुडी नदीने पुन्हा धोक्याची पातळी गाठली

खेड तालुक्यात रात्रभर पावसाचा जोर कायम असल्याने जगबुडी नदी धोकादायक पातळीवरून वाहत असल्याने खळबळ उडाली आहे. खेड शहरात अद्याप पाणी आलेले नाही. मात्र जगबुडी नदी काठच्या सुमारे पंचवीस ते तीस गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

यामध्ये अलसुरे निळीक, भोस्ते, शिव बुद्रुक आदी गावांचा समावेश आहे. वेरळ व सुकीवली येथील वाड्यांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मागील आठ दिवसात जगबुडी नदीने अनेकदा धोक्याची पातळी ओलांडली आहे. आज सकाळपासून जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून म्हणजेच ७.२० मीटर यावरून वाहत आहे. ७ मीटर ही जगबुडी नदीची धोकादायक पातळी आहे. 

हे ही वाचा : Bhandara Accident : भंडाऱ्यात भर पावसात भीषण अपघात, सुसाट बस-ट्रकवर आदळली, दोघांचा जागीच मृत्यू

दापोली खेड मार्गावरही पाणी आले नसले तरी पावसाचा जोर कायम राहिला तर हा मार्ग कोणत्याही क्षणी बंद होऊ शकतो. मुंबई – गोवा महामार्गावरील नवीन पुल मात्र वाहतूकीसाठी खुला आहे. तिथपर्यंत पाणी पोहचलेले नाही.

खेड पालिका हद्दीत नदीकाठी झोपडपट्टी आहे. तेथील ३७ कुटुंबांना गेल्या आठवड्यात सुरक्षित स्थळी हलवले आहे. मुकदाम हायस्कूल, एलपी स्कुल आदी ठिकाणी या कुटुंबाची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

First published:

Tags: Chiplun, Crocodile, Rain flood, Rainfall, Ratnagiri, Western zone ratnagiri