जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / संभाजी ब्रिगेडमध्ये फूट;प्रवीण गायकवाड नव्या ब्रिगेडचे अध्यक्ष

संभाजी ब्रिगेडमध्ये फूट;प्रवीण गायकवाड नव्या ब्रिगेडचे अध्यक्ष

संभाजी ब्रिगेडमध्ये फूट;प्रवीण गायकवाड नव्या ब्रिगेडचे अध्यक्ष

संभाजी ब्रिगेड मुळात एक सामाजिक संघटना होती. प्रवीण गायकवाड आधी या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

    25मार्च: मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडमध्ये फूट पडली आहे. राजकीय पक्ष म्हणून ब्रिगेडसोबत काम करण्यास नकार दिलेल्या मंडळींनी स्वतंत्र ब्रिगेड स्थापन केली आहे. संभाजी ब्रिगेड मुळात एक सामाजिक संघटना होती. प्रवीण गायकवाड आधी या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष होते.पण नंतर अंतर्गत धुसफुसीमुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पुढे मनोज आखरे या नव्या अध्यक्षांनी ब्रिगेडची नोंद राजकीय पक्ष म्हणून केली. काही काळ शेकापमध्ये गेल्यानंतर मनोज गायकवाड यांनी पुन्हा संभाजी ब्रिगेडचा सामाजिक संघटना म्हणून झेंडा हाती घेतला आहे. आता नव्यानेच तयार झालेल्या या ब्रिगेडच्या अध्यक्षपदी प्रवीण गायकवाड यांची निवड झालीय. मात्र या फुटीर गटाने त्यांच्या संघटनेला संभाजी ब्रिगेड हे नाव वापरू नये असा इशारा विद्यमान अध्यक्ष मनोज आखरे यांनी दिला आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात