खून, दरोडे आणि महिला अत्याचारानंतर आता नगर जिल्ह्यात फोफावले अवैध धंदे

खून, दरोडे आणि महिला अत्याचारानंतर आता नगर जिल्ह्यात फोफावले अवैध धंदे

पोलीस या गुन्ह्यांकडे सोईस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.

  • Share this:

अहमदनगर, 27 फेब्रुवारी : खून, दरोडे, महिला अत्याचार असे गुन्हे अहमदनगर जिल्ह्यात सातत्याने वाढत असताना आता अवैध धंदे फोफावल्याचे विदारक चित्र आहे. मटका, हातभट्टी दारू, सौरट, गुटख्याला बंदी असतानाही गुटखा राजरोसपणे विकला जातोय, वाळू धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे पोलीस या गुन्ह्यांकडे सोईस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.

पारनेर तालुक्यातील खून, कर्जत तालुक्यातील पळून गेलेले 302 सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अजूनही सापडले नाही. शहर सहकारी बँक घोटाळ्याती हाय फोफाईल गुन्ह्यातील आरोपी पोलिसांना सापडत नाहीत. मात्र जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांनी घेरलं आहे. सोरट, मटका, बिंगो जुगार, गावठी दारू, सुगंधी तंबाखू उत्पादनाचे छोटे कारखाने, वेश्या व्यवसाय, चोर्‍या, लुटीच्या तयारीत असलेले टोळक्यांनी डोकं वर काढलं आहे.

गुटख्याला बंदी असतानाही जिल्ह्यात कुठेही गुटखा मिळतो. सुगंधी तंबाखुचे उत्पादन 24 तास सुरू आहे.  जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचा प्रभारी कारभार सुरू आहे. त्यातच शहरालगत असलेलं अवैध धंद्यांच्या विळख्यात ओढला जात आहे. या अवैध धंद्याला बळ मिळत आहे, ते दलालांचं. यात युवक, तरुण अधिकपणे आहेत. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता

अवैध धंद्यांची माहिती नाही, असे होणं शक्य नाही. खुलेपणानं सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई का नाही? हा प्रश्न आहे.  विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक घेऊन जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला होता. त्यात अवैध धंद्यांना चाप लावा अशा सूचना देखील दिल्या असल्याची माहिती आहे. परंतु त्यांच्या आदेशाला जिल्हातील पोलिसांनी केराची टोपली दाखविल्याचे दिसते आहे. त्यामुळे अहमदनरमधील गुन्हेगारीला थांबवण्यासाठी पोलीस प्रशासन आगामी काळात तरी पाऊलं उचलणार का, हे पाहावं लागेल.

First published: February 27, 2020, 9:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading