मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /धक्कादायक ! आधी इंजेक्शन देत बेशुद्ध केलं आणि मग गाडीत कोंबून गुरांची चोरी, अमरावतीमधील घटनेचा VIDEO

धक्कादायक ! आधी इंजेक्शन देत बेशुद्ध केलं आणि मग गाडीत कोंबून गुरांची चोरी, अमरावतीमधील घटनेचा VIDEO

आधी इंजेक्शन देत बेशुद्ध केलं आणि मग गाडीत कोंबून गुरांची चोरी, घटनेचा VIDEO आला समोर

आधी इंजेक्शन देत बेशुद्ध केलं आणि मग गाडीत कोंबून गुरांची चोरी, घटनेचा VIDEO आला समोर

Cattle theft caught in cctv: रस्त्यावर मोकाट फिरत असलेल्या गुरांची इंजेक्शन देऊन चोरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

अमरावती, 30 सप्टेंबर : अनेकदा मोठ्या जड वाहनातून गाईंची  तस्करी होत असल्याच्या अनेक घटना पुढे आल्यात. मात्र चक्क रस्त्यावरील मोकाट असलेल्या जनावरांची कारमधून तस्करी होत असल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील (Amaravati District) धामणगाव रेल्वे (Dhamangaon Railway) येथे समोर आली आहे. धामणगाव रेल्वेतील शिवाजी चौकात 27 सप्टेंबर रोजी रात्री 1 वाजता रस्त्यावरील मोकाट जनावरे असताना एका गाडीतून 3 माणसे उतरली आणि जनावरांना इंजेक्शन लावून त्यांना फोर व्हीलर गाडीत कोंबून नेत असल्याचं सीसीटीव्ही (Cow theft by giving anesthesia injection, caught in cctv) फुटेजमुळे उघडकीस झालं आहे.

त्यानंतर लगेच हीच इनोव्हा गाडी रात्री 1 वाजून 18 मिनिटांनी परत येऊन शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या जनावरांना गाडीत कोंबून टाकत नेत असल्याची घटना सुद्धा कॅमेऱ्यात कैद झाली आहे. इतकंच नाही तर 2 मिनिटांनी पेट्रोलिंग करणारी पोलिसांची गाडी मागेच आली आहे. हा सगळा प्रकार रात्री 1 ते 1 वाजून 29 मिनिटांच्या कालावधीत झालाय. मात्र पोलिसांना या घटनेविषयी काहीही माहिती नसल्याच पोलीस सांगताहेत. त्यामुळे येथे नक्कीच पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. धामणगाव परिसरात जनावरे पळविणारी टोळी सक्रिय असल्याने परिसरातील नागरिकांनी वेळीच सावध होणे मात्र गरजेचे आहे.

लोणावळ्यातही इंजेक्शन देत बेशुद्ध करुन गुरांची चोरी

काही दिवसांपूर्वी असाच प्रकार लोणावळ्यातून समोर आला होता. लोणावळा शहरात रात्रीच्या वेळी गाई, वासरांना बेशुद्ध करून पळवुन नेण्याचा प्रकार पहाटेच्या सुमारास उघडकीस आला होता. लोणावळ्यातील ओळकाई वाडी येथे हा प्रकार घडला होता. भटक्या गाईंना बेशुद्ध करत असल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला.

मध्यरात्री साखर झोपेत असताना या मुक्या जनावरांना काही तरुणांनी पाव खायला टाकले आणि पटकन भुलीचे इंजेक्शन देऊन गाई वासरांना बेशुद्ध केल्यावर चार चाकी गाड्यांमध्ये भरुन नेण्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. या गुन्हेगारांना त्वरीत अटक करण्यात यावे असं निवेदन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल मावळ,आणि वारकरी संप्रादय हिंदू समिती लोणावळा यांच्या वतीने लोणावळा ग्रामीण आणि शहर पोलीस स्टेशनला देण्यात आले होते.

या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा नोंद करून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला. लोणावळ्यात भररस्त्यात असा प्रकरा घडत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त करण्यात आली. दरम्यान अशा प्रकारे गुरांची चोरी होण्याचे प्रकार यापूर्वी सुद्धा अनेक ठिकाणी घडल्याचं समोर आलं आहे.

First published:

Tags: Amravati, Cctv footage, Crime