Home /News /maharashtra /

Covid किट घालून द्यावी लागणार MPSC ची परीक्षा; आयोगाच्या निर्णयानंतर चर्चेला उधाण

Covid किट घालून द्यावी लागणार MPSC ची परीक्षा; आयोगाच्या निर्णयानंतर चर्चेला उधाण

21 मार्च रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा घेण्यात येणार आहे.

    सोलापूर, 18 मार्च : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी आहे. दरम्यान MPSC ची परीक्षा अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली होती, मात्र राज्यातील विद्यार्थ्यांनी याबाबत राज्य सरकारचा निषेध करीत आंदोलन पुकारलं होतं. त्यानंतर 21 मार्च रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा घेण्यात येणार आहे. दरम्यान एक महत्त्वाची मात्र अजब बातमी समोर आली आहे. (Covid kit will be required for MPSC examination ) कोरोनाचा प्रादुर्भाव बळावू नये यासाठी विद्यार्थ्यांना बेसिक किट घालून परीक्षा द्यावी लागणार आहे. आयोगाच्या या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात होणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना दोन किट दिले जाणार आहे. किटमध्ये नेमकं काय असेल या बाबत अद्याप कोणीतही माहिती मिळू शकलेली नाही. (Covid kit will be required for MPSC examination) हे ही वाचा-BREAKING : 10 वी आणि 12वीच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना महत्त्वाची सूचना 21 मार्च रोजी महाराष्ट्र लोकसेवाच्या परीक्षा होणार आहेत.  सोलापूर शहरातील 22 केंद्रावर जवळपास 8 हजार 800 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यामध्ये केंद्राला कोरोना किट द्यावे लागणार आहे. जिल्हा प्रशासनाकडे यासंदर्भातील माहिती उपलब्ध झाली आहे. एमपीएससी परीक्षेत कोरोना किट देणार असून पीपीई नाही, त्यामुळे परीक्षार्थींनी गोंधळून जाऊ नये. निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी ही माहिती दिली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona spread, Corona updates, Mpsc examination

    पुढील बातम्या