Home /News /maharashtra /

सावधान! महाराष्ट्रासह देशात पुन्हा वाढला कोरोना, 24 तासांमध्ये 18930 नवे रूग्ण

सावधान! महाराष्ट्रासह देशात पुन्हा वाढला कोरोना, 24 तासांमध्ये 18930 नवे रूग्ण

राज्यासह देशभर पावसाचा जोर वाढत असतानाच कोरोनानंही (Covid-19) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.

    मुंबई, 7 जुलै :  राज्यासह देशभर पावसाचा जोर वाढत असतानाच कोरोनानंही (Covid-19) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशभरात कोरोनाचे 18930 नवे पेशंट्स आढळले आहेत. या दरम्यान 35 जणांचा मृत्यू झालाय. देशभरातील अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 119457 झाली आहे. तर रोजचा पॉझिटिव्हीटी रेट आता 4.32 टक्क्यांवर पोहचला आहे. महाराष्ट्रात धोका वाढला महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाच्या 3000 पेक्षा जास्त केस आढळल्या आहेत. बुधवारी राज्यात 3142 जणांना कोरोनाची लागण झाली. मुंबईत 695 जण कोरोनामुळे संक्रमित झाले. राज्यात कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 19981 वर पोहचली आहे. ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे 358 नवे रूग्ण आढळले आहेत. ठाणे जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची आजवरची संख्या  7,30,427 झाली आहे. तामिळनाडूमध्ये आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार बुधवारी कोरोनाचे 2,743 नवे पेशंट्स आढळले. राजधानी चेन्नईमध्ये 1,062 नवे रूग्ण आढळले आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये 1,791 जण कोरोनामुक्त झाले आहेत. Vivo कंपनीचे संचालक भारतातून फरार; ED च्या छाप्यानंतर आतापर्यंत काय घडलं? दिल्लीमध्ये 600 नवे कोरोना रूग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील संक्रमण दर कमी होऊन 3.27 टक्के झाला आहे. मंगळवारी दिल्लीत 615 नवे रूग्ण आढळले होते. तर तीन जणांचा मृत्यू झाला होता. दिल्लीत आत्तापर्यंत 19, 38,648 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus cases, Covid19

    पुढील बातम्या