Home /News /maharashtra /

औरंगाबाद हादरलं..! पती-पत्नीची हत्या; कुजलेल्या अवस्थेत आढळले घरात मृतदेह

औरंगाबाद हादरलं..! पती-पत्नीची हत्या; कुजलेल्या अवस्थेत आढळले घरात मृतदेह

औरंगाबादमधून (Aurangabad) एक धक्कादायक बातमी समोर येतेय. पुंडलीकनगरमध्ये (Pundalikanagar) एका पती-पत्नीची हत्या करण्यात आली आहे.

    औरंगाबाद, 23 मे: औरंगाबादमधून (Aurangabad) एक धक्कादायक बातमी समोर येतेय. पुंडलीकनगरमध्ये (Pundalikanagar) एका पती-पत्नीची हत्या करण्यात आली आहे. कुजलेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह घरात आढळून आले आहेत. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 55 वर्षांचे शामसुंदर हिरालाल कलंत्री आणि 45 वर्षांचे किरण शामसुंदर कलंत्रीअशी मृताची नावे आहेत. दरम्यान मुलानंच आई वडिलांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. ठाण्यात कोठारी कंपाऊंड परिसरात अग्नितांडव, आगीचा Live Video कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. हत्येनंतर मृतदेह वेगवेगळ्या मजल्यावर ठेवण्यात आले आहे. घरात पलंगाखाली मृतदेह लपवून ठेवलेले आढळून आले. मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात कधी आहेत मुहूर्त? येथे जाणून घ्या सर्व शुभ मुहूर्तांची यादी या हत्येच्या सत्रानं औरंगाबाद शहर हादरलं आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु करण्यात आला आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Aurangabad, Aurangabad News

    पुढील बातम्या