कोरोनाचं थैमान, लॉकडाउनसाठी नागपूरमध्ये स्वत: तुकाराम मुंढे मैदानात

कोरोनाचं थैमान, लॉकडाउनसाठी नागपूरमध्ये स्वत: तुकाराम मुंढे मैदानात

दुकाने बंद करून लोकांनी कायद्याचे पालन करावं अन्यथा कारवाई करू, असा इशारा दिला आहे.

  • Share this:

नागपूर, 21 मार्च : नागपूरमध्ये लॉकडाउन जाहीर केल्यानंतर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे हे अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसू लागले आहेत. नागपूरच्या सीताबर्डी मार्केट परिसरात त्यांनी लॉक डाउनच्या परिस्थितीचा आढावा घेत सुरू असलेल्या दुकाने बंद करून लोकांनी कायद्याचे पालन करावं अन्यथा कारवाई करू, असा इशारा दिला आहे.

लॉकडाउनबाबत शुक्रवारी रात्री 12 वाजपासून अंमलबजावणी केली जाईल, तसेच 31 मार्च पर्यंत संबंधित आदेश लागू राहणार आहे, असं महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितलं. ज्या भागात आयसोलेशन सेंटर, क्वारन्टाईन सेंटर घोषित करण्यात आले आहे अशा भागात वाहनांच्या आधागमनावर पूर्णत: प्रतिबंध घालण्यात आला आहे.

गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेशात नमूद आहे. संपूर्ण खासगी, कॉपोरेट कंपनी आणि आस्थापना पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागपूर शहरासह मिहान, बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्वर येथील सर्व उद्योग, कारखाने बंद राहतील. मात्र अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या सेवा य कर्मचारी वर्ग आदींना वगळण्यात आले आहे.

हेही वाचा- महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 63 वर, गेल्या 24 तासात आढळले 11 रुग्ण!

कुठलीही सेवा किंवा आस्थापना सुरू ठेवणे आवश्यक आहे, अथवा नाही यासंदर्भात शंका असल्यास मनपा आयुक्त त्याचा निर्णय घेतील. या संपूर्ण आदेशाचे पालन करण्यासाठी मनपाचे सर्व झोनचे सहायक आयुक्त, पोलीस अधिकारी नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती मुंढे यांनी दिली,

थुंकणाऱ्यांना 1 हजार रुपयांचा दंड

रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींना 10000 रु. दंड आकारण्यात येईल. मनपाच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी आणि पोलिसांना यासंदर्भात दंड करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

First published: March 21, 2020, 11:53 AM IST

ताज्या बातम्या