विनय म्हात्रे, प्रतिनिधीरायगड, 25 मार्च : देशावर कोरोनाचे संकट कोसळले आहे. या संकटाने लोक भीतीच्या छायेखाली आहेत. त्यामुळे गावाच्या, शहराच्या सीमादेखील बंद करण्यात आल्यात. जेणेकरून संसर्ग पसरू नये. राज्यात काही गावांनी आपल्या सीमा बंद केल्या आहेत. पण, रायगड जिल्ह्यातल्या कळंब गावात एका जावायाला बांधून ठेवण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
कोरोना व्हायरसबद्दल काही ठिकाणी लोकांनी रोगांपेक्षा इलाज भयंकर अशी अवस्था करून ठेवली आहे. सरकारकडून वारंवार घरात राहा अशी सूचना दिली जातेय. पण तरीही लोकं एखाद्या जत्रेप्रमाणे गर्दी करत आहे.
याचा सर्वात मोठी परिणाम हा ग्रामीण भागात पाहण्यास मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील कळंब गावात पुण्याहून आलेल्या एका जावायाला चक्क खांबाला बांधून ठेवण्यात आलं होतं.
हरी वरपे हे पुण्याहून कळंबमधील गरूडपाडा इथं आपल्या सासरी बायकोला नेण्यासाठी आले होते. मात्र, त्याला खोकला, शिंका येत असल्याने तो कोरोनाबाधित असल्याची शंका आली. त्यामुळे सासरच्या मंडळींनी त्याला परत जायला सांगितलं.
मात्र, तो परत जात नसल्याने त्याला घराच्या बाहेरच बांधून ठेवण्यात आलं आहे. या प्रकाराने गावकरी भयभीत झाले आहेत. तर बांधून ठेवलेले वरपे हे जिवाच्या आकांताने ओरडत होते. परंतु, प्रशासन जागेवर न आल्याने वरपे यांचा जगण्यासाठी आर्त धावा देत होते.
हेही वाचा - Coronavirus होऊ नये म्हणून काय करायचं? छोट्या घरात राहणाऱ्यांना पडलेत प्रश्न
अखेर पोलीस घटनास्थळी पोहचून वरपे यांची सुटका केली. त्यानंतर वरपे हे खरंच कोरोनाबाधित आहे की नाही यासाठी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, तिथे तपासणी केली असता अशी कोणतीही लक्षणं आढळून आली नाही. शासकीय रुग्णालयातून त्यांना सोडण्यातही आलं आहे.
परंतु, कोरोना व्हायरसच्या अपुऱ्या माहितीमुळे सासरीच जावयाला दिलेल्या वागणुकीमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.