• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • Corona Virus : लॉकडाउनपासून मुंब्य्राला वगळण्यात आलंय का?

Corona Virus : लॉकडाउनपासून मुंब्य्राला वगळण्यात आलंय का?

कोरोना मुंब्राच्या वेशीवर असताना मुंब्रावासीयांनी असं बाहेर पडणं कितपत योग्य आहे

  • Share this:
मुंब्रा, 04 एप्रिल : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. भारतातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. खबरदारी म्हणून देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. परंतु, लॉकडाउनपासून मुंब्रा वगळण्यात आलंय का? असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण, नेहमी सारखी गर्दी आज सकाळी मुंब्य्रामध्ये पाहायला मिळाली आहे. विशेष म्हणजे, मुंब्य्रात राज्य राखीव दलही तैनात करण्यात आलं होतं. परंतु, त्यांनाही परत पाठवण्यात आलंय का? असा सवाल उपस्थितीत केला जात आहे. मुंब्रा शहराच्या फक्त दोन्ही प्रवेश द्वारावर काही तुरळक पोलीस बंदोबस्त सोडला तर संपुर्ण मुंब्रा शहरात कुठेही पोलीस दिसले नाही. यामुळे मुंब्रावासी मोठ्या संख्येनं रस्त्यावर निवांत फिरताना दिसत आहे.  धक्कादायक म्हणजे मुंब्य्रामध्ये रिक्षा देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून धावताना दिसल्या. नुकतंच मुंब्रा येथून मरकजसाठी निजामुद्दीन येथे गेलेल्या 13 बांग्लादेशी आणि 2 आसामच्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली असून त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. कोरोना मुंब्राच्या वेशीवर असताना मुंब्रावासीयांनी असं बाहेर पडणं कितपत योग्य आहे. त्यामुळे न्यूज 18 लोकमत मुंब्रावासीयांना आवाहन करतंय की, घरात राहा, सुरक्षित राहा. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 490 वर पोहोचली आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. मुंबईतल्या कोरोनाबाधितांची संख्या 278 झाली आहे. पुण्यात आज 9 रुग्ण सापडले तर नवी मुंबईत 8 कोरोनाग्रस्त सापडले.  राज्यात कोरोनामुळे आत्तापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी मुंबईतील 19 जणांचा समावेश आहे.
Published by:sachin Salve
First published: