अकोला, 11 एप्रिल : महाराष्ट्राला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला आहे. परंतु, अकोल्यामध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे 7 एप्रिल रोजी या रुग्णाला अकोला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे हा रुग्ण पाच वाजेच्या सुमारास गळा कापलेल्या अवस्थेत बाथरूममध्ये रक्तबंबाळ असल्याचे दिसून आला. हेही वाचा - कोरोनाशी लढण्यासाठी रस्त्यावर उतरले चक्क ‘यमराज’, घरातून बाहेर पडाल तर… रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्याला तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी या रुग्णाला वाचवण्याचा आटोकात प्रयत्न केला. परंतु, शस्त्रक्रिया सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. हा 30 वर्षीय रुग्ण मूळचा सालपडा जिल्हा नागाव, आसाम येथील रहिवासी आहे. शुक्रवारी 10 एप्रिल रोजी आलेल्या अहवालात हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. हेही वाचा - आईच्या प्रेमाला तोडू नाही शकला कोरोना, नर्स लेकीला पाहताच आईने मारली घट्ट मिठी यासंदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत, असेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळवले आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1574 वर दरम्यान, आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1574 पर्यंत पोहोचली असून मृत्यूचा आकडा 110 पर्यंत पोहोचला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत ही संख्या खूप जास्त आहे. यातही सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहे. मुंबईत रुग्णांची संख्या 1008 झाली असून मृतांचा आकडा 64 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रातील एकूण रुग्णाच्या 65 टक्के रुग्ण हे एकट्या मुंबईत आहेत. तर देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी जवळपास 15 टक्के रुग्ण मुंबईत आहेत. शुक्रवारी मुंबईत एकाच दिवसात 218 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.