मुंबई, 21 मे: गेल्या काही दिवसात मुंबई (Mumbai) आणि महाराष्ट्रात (Maharashtra) वाढणारा कोरोनाचा (Corona) आलेख आता हळूहळू कमी होत आहे. असे असले तरी भविष्यात पुन्हा तिसरी लाट येऊ नये म्हणून आता राज्य सरकार अलर्ट झालं आहे. मुंबईत परराज्यातून ट्रेनमधून येणाऱ्या प्रवाशांना ट्रेनमध्ये चढताना, प्रवासात आणि गंतव्यस्थानावर कोविड-19 संदर्भातील सूचनांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारच्या 12 मे 2021 च्या ब्रेक द चैन नोटीफिकेशन नुसार, वाहतुकीच्या कोणत्याही मार्गाने महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल (Negative RT-PCR report mandatory) घ्यावा लागेल, जो महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी 48 तास अगोदर केलेला असेल. 18 एप्रिल 2021 आणि 1 मे 2021 रोजीच्या आदेशानुसार केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि एनसीआर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या ‘संवेदनशील उत्पत्ती’ च्या ठिकाणच्या राज्यांमधून आलेल्या व्यक्तींना लागू करण्यात आलेली सर्व निर्बंधे देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्र राज्यात येणार्या प्रत्येकाला लागू असतील. 7000 रुग्ण, 200 बळी; कोरोनानंतर आता आणखी एका भयंकर आजाराचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात राज्यस्तरीय नवीनतम सूचना http://contents.irctc.co.in/en/stateWiseAdvisory.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्या नियंत्रणात आली असली तरी देशातील इतर राज्यात मात्र कोरोना रुग्ण संख्या वाढतच आहे. केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि एनसीआर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या ठिकाणची रुग्ण संख्या जास्त आहे. उत्तर प्रदेशमधील अनेक कामगार मुंबईत कामासाठी पुन्हा परत येतील जे मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोना आणि लॉकडाऊनच्या भीतीने आपल्या मूळ गावी गेले होते.आता पुन्हा जून महिन्यात हे कामगार परत मुंबईत येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यावर हळूहळू उद्योग व्यवसाय पुन्हा सुरू होतील. त्यामुळे हे पुन्हा येतील. त्यामुळेच राज्य सरकारने असे नियम केले आहेत यात लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणार्या प्रवाशांना मार्गदर्शक सूचना तपासण्याचे तसेच स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड -19 प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.