मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

7000 रुग्ण, 200 बळी; कोरोनानंतर आता आणखी एका भयंकर आजाराचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात

7000 रुग्ण, 200 बळी; कोरोनानंतर आता आणखी एका भयंकर आजाराचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात

कोरोनानंतर आता महाराष्ट्र सरकारसह देशासमोरही नव्या आजाराला नियंत्रणात ठेवण्याचं मोठं आव्हान आहे.

कोरोनानंतर आता महाराष्ट्र सरकारसह देशासमोरही नव्या आजाराला नियंत्रणात ठेवण्याचं मोठं आव्हान आहे.

कोरोनानंतर आता महाराष्ट्र सरकारसह देशासमोरही नव्या आजाराला नियंत्रणात ठेवण्याचं मोठं आव्हान आहे.

  • Published by:  Priya Lad

नवी दिल्ली, 21 मे : एकिकडे कोरोनावर (Coronavirus) नियंत्रण मिळवण्यात देशाला यश मिळताना दिसतं आहे. भारताला मोठा दिलासा मिळतो आहे. तर दुसरीकडे मात्र कोरोनाशी संबंधित आणखी काही आजारांचं आव्हान उभं ठाकलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे म्युकोरमायकोसिस (Mucormycosis) म्हणजे ब्लॅक फंगस (Black Fungus). कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना ब्लॅक फंगसच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. अवघ्या काही दिवसांत हजारो रुग्ण सापडले आहेत, तर शेकडोंचा बळी गेला आहे. विशेष म्हणजे ज्या महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण होते, त्याच महाराष्ट्रात आता म्युकोरमायकोसिसचेही सर्वाधिक रुग्ण आहेत.

आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत ब्लॅक फंगसचे 7 हजारपेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. 200  पेक्षा जास्त रुग्णांचा या आजाराने जीव घेतला आहे. या आजाराचे एकूण  7250  रुगिण सापडले आहेत. सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू हे महाराष्ट्रातच झाले आहेत. त्यानंतर गुजरात आणि मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. गुजरातमध्ये 1163 रुग्ण आणि 63 मृत्यू, तर मध्य प्रदेशमध्ये रुग्ण आणि  31 मृत्यू आहेत. इतर राज्यातही काही प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत.

पुण्यात सर्वात जास्त रुग्ण

पुण्यातील कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत असतानाच आता पुन्हा पुणेकरांची चिंता वाढली आहे. राज्यात कोरोनाचे (Coronavirus) सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यात होते आणि आता म्युकरमायकोसिस (Mucormycosis) आजाराचे सर्वाधिक रुग्ण हे पुण्यातच (Mucormycosis highest patients in Pune) असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्याच्या पाठोपाठ म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण हे नागपूर जिल्ह्यात आहेत.पुण्यात म्युकरमायकोसिसचे 273 रुग्ण आहेत. त्यानंततर नागपुरमध्ये 148 रुग्ण आहेत. औरंगाबादमध्ये 67 रुग्ण आहेत. नांदेडमध्ये 60, चंद्रपुरात 48, लातूर 28 तर ठाण्यात 22 रुग्ण आहेत.

हे वाचा - Coronavirus: राज्यातील रुग्णसंख्येत मोठी घसरण; रिकव्हरी रेटही वाढला

राज्यात म्युकरमायकोसिस या आजाराची तीव्रता वाढत असून त्यासाठी बहुआयामी विशेषज्ञ सेवांची गरज भासत आहे. त्यासाठी लागणार खर्च जास्त असून सामान्य रुग्णांवर त्याचा भार पडून नये यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र नागरिकांवर अंगीकृत रुग्णालयांमध्ये म्युकोरमायकोसिस आजारावर उपचार करण्यात येणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

हे वाचा - खळबळजनक! कोरोनापाठोपाठ Mucormycosis सुद्धा लहान मुलांपर्यंत पोहोचला

या आजाराचा प्रकोप लक्षात घेता केंद्र सरकारने या आजाराला साथरोग प्रतिबंध कायद्याअंतर्गत (Epidemic Diseases Act) समाविष्ट करण्याच्या सूचनाही राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत. याआआधी राजस्थान, तामिळनाडू, ओडिशा, आसाम पंजाबमध्ये या आजाराला Epidemic Diseases Act 1897 अंतर्गत अधिसूचित करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Coronavirus, Disease symptoms, Serious diseases