महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर शिर्डीतील साईमंदिरावरही झाला परिणाम

महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर शिर्डीतील साईमंदिरावरही झाला परिणाम

लोकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण असून लोक सार्वजनिक ठिकाणी जाण्याचं टाळू लागले आहेत.

  • Share this:

शिर्डी, 12 मार्च : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या 'कोरोना'चं संकट आता महाराष्ट्रात येऊन धडकलं आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारीचे विविध उपाय केले जात आहेत. मात्र असं असतानाही लोकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण असून लोक सार्वजनिक ठिकाणी जाण्याचं टाळू लागले आहेत.

कोरोनाच्या भीतीचा शिर्डीतील साईमंदिरावरही परिणाम झाला असून गुरूवारी गर्दीचा वार असताना दर्शनरांगा मात्र ओस पडल्याचं पाहायला मिळालं. दर्शनासाठी बुधवारच्या तुलनेत गर्दी  कमी झाली. या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानकडून नॉन कॉनटँक्ट इन्फ्रारेड थर्मामीटरचे प्रात्यक्षिक करण्यात आले आहे.

दर्शनरांगेत प्रवेश करताना थर्मामीटरने भाविकाची तपासणी करण्यात येत आहे. तापाची तपासणी करण्यासाठी थर्मामीटर व्यवस्था करण्यात आली आहे. लवकरच यासाठी अधिकृतपणे यंत्रणा  कार्यान्वित होणार आहे. तसंच संस्थानाकडून साफसफाईसोबत हॅण्ड सँनेटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा- कोरोनाचा फटका, पोल्ट्री धारकांनी कोंबड्या फुकट वाटल्या; नागरिकांची मोठी झुंबड

कोरोना संशयित रुग्णांसाठी साईबाबा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डची व्यवस्था केली गेली आहे. त्यामुळे एकूणच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संस्थानाकडून संपूर्ण सतर्कता ठेवण्यात येत असल्याचं दिसत आहे.

राज्यातील सर्व यात्रा रद्द करण्याचे आदेश

गर्दीच्या ठिकाणी कोरोना व्हायरस वेगाने पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सर्व मोठ्या यात्रा रद्द करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. गर्दी होईल अशा सर्व यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत केंद्रीय आपत्ती सचिवांकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना आदेश दिले आहेत.

First published: March 12, 2020, 4:06 PM IST

ताज्या बातम्या