मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Coronavirus : राज्यात 24 तासांत 8369 नवे रुग्ण; पण मृत्यूदर झाला कमी

Coronavirus : राज्यात 24 तासांत 8369 नवे रुग्ण; पण मृत्यूदर झाला कमी

काही कोरोना रुग्णांमध्ये त्वचा कोरडी पडणे आणि खाज सुटणे असेही लक्षणे दिसून आली होती.

काही कोरोना रुग्णांमध्ये त्वचा कोरडी पडणे आणि खाज सुटणे असेही लक्षणे दिसून आली होती.

24 तासांत 7188 रुग्णांना बरं होऊन घरी सोडण्यात आलं. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 3 लाख 27 हजार 31 एवढी झाली आहे. मुंबई, ठाण्यात नव्हे तर आता या जिल्ह्यात आहेत सर्वाधित Corona रुग्ण

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी

मुंबई, 21 जुलै : महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचा (Coronavirus maharashtra updates) संसर्ग कमी झालेला नाही, पण बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा आकडा मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासांत 8369 नव्या Covid रुग्णांचं निदान झालं आहे, तर 246 जणांना मृत्यू नोंदवण्यात आला आहे. दिवसभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. 7188 रुग्णांना बरं होऊन घरी सोडण्यात आलं. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 3 लाख 27 हजार 31 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 12,276 वर गेला आहे.

Unlock नंतर Corona रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली. त्यानंतर पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही शहारांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला. पण तरीही कोरोना रुग्णांची संख्या वाढतेच आहे. मृत्यूदर फारसा वाढलेला नाही , हा त्यातल्या त्यात दिलासा म्हणावा लागेल. आतापर्यंत महाराष्ट्रात तीन लाखांवर कोरोना रुग्ण सापडले असले तरी त्यातले 1,82,217 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

21 जुलै पर्यंतची आकडेवारी

अॅक्टिव्ह रुग्ण - 1,32,236

24 तासांतली वाढ - 8369

बरे झालेले रुग्ण - 1,82,217

एकूण मृत्यू - 12276

एकूण रुग्ण - 3,27,031

सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण सध्या पुणे जिल्ह्यात आहे. ठाणे जिल्ह्याला पुण्याने या बाबतीत मागे टाकलं आहे. त्यानंतर मुंबईचा क्रमांक लागतो. एकूण रुग्णसंख्या मुंबईत अधिक असली तरी नवे रुग्ण कमी झाले आहेत आणि बऱ्या झालेल्या रुग्णांचं प्रमाणही मुंबईत मोठं आहे. ठाणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसाच पुणे शहर आणि जिल्ह्यातही वेगाने कोरोनाचा प्रसार होत आहे. महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक Coronavirus चे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

अॅक्टिव्ह रुग्णसंख्या जिल्ह्यानुसार

मुंबई 23704

ठाणे 36219

पुणे 36810

रायगड 5357

पालघर 5312

First published:

Tags: Coronavirus