Home /News /maharashtra /

Corona : मुंबईनंतर ठाण्यातही साथ आटोक्यात; पण कुठल्या जिल्ह्यांत वाढतोय धोका? पाहा लेटेस्ट आकडे

Corona : मुंबईनंतर ठाण्यातही साथ आटोक्यात; पण कुठल्या जिल्ह्यांत वाढतोय धोका? पाहा लेटेस्ट आकडे

देशात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तर संख्येत विस्फोट झाल्यासारखी स्थिती असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तर संख्येत विस्फोट झाल्यासारखी स्थिती असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांतला दहा हजारी आकडा पाहता दररोजच्या रुग्णसंख्येत किंचित घट झाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दिलासा मिळाला असला, तरी नवी चिंता वाढली आहे.

    मुंबई, 10 ऑगस्ट : Coronavirus चे महाराष्ट्रातले आकडे कमी होण्याचं नाव घेत नाहीत. पण सुरुवातीला मुंबई आणि नंतर ठाण्यात असलेला साथीचा केंद्रबिंदू आता इतरत्र हलतो आहे, हे आजच्या ताज्या आकडेवारीवरून लक्षात येईल. राज्यात गेल्या 24 तासांत 9,181 नवीन रुग्णांची नोंद झाली. गेल्या चार दिवसांतला दहा हजारी आकडा पाहता यात किंचित घट झाल्याचा दिलासा आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारीसुद्धा वाढली आहे. पण अगोदर कमी रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये वाढणारे रुग्ण ही साथ फैलावाची नवी डोकेदुखी ठरू शकते. आज दिवसभरात 6,711 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण 3 लाख 58 हजार 421 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68.33 टक्के झालं आहे. राज्यात आज 293 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूदर 3.44 टक्के एवढा आहे. राज्यात 10,01,268 व्यक्ती घरात विलगीकरणात आहेत, तर 35,521 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरण मध्ये आहेत. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता 5,24,513 झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 18050 वर गेला आहे. राज्यभरात उपचार सुरू असलेले (Active corona patients) तब्बल 1,47,735 रुग्ण आहेत. एकीकडे Covid रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं, तरी संसर्ग वेगाने पसरतो आहे, हे आजच्या आकडेवारीने स्पष्ट झालं. देशाच्या Recovery Rate पेक्षा महाराष्ट्राचा अद्याप जास्त आहे. देशाच्या सरासरी मृत्यूदरापेक्षा महाराष्ट्राचा मृत्यूदरही अधिक आहे. राज्यातला मृत्यूदर 3.44 एवढा झाला आहे. देशाचा सरसारी कोविड मृत्यूदर 2 टक्क्यांच्या जवळपास आहे. ‘मिशन धारावी’ने करून दाखवलंच, 24 तासांमध्ये आढळले फक्त 5 कोरोना रुग्ण! सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात असले तरी गेल्या चार पाच दिवसांत अॅक्टिव्ह रुग्णसंख्या कमी होत आहे. उलट नाशिक, कोल्हापूर, सोलापूर आणि नागपूर जिल्ह्यांतली अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता झपाट्याने वाढताना दिसते आहे. अॅक्टिव्ह रुग्णसंख्या जिल्ह्यानुसार पुणे 40278 ठाणे 20966 मुंबई 19172 नाशिक 7555 नागपूर 5897 कोल्हापूर 5831 पालघर 5512 औरंगाबाद 5415 सोलापूर 4572 अहमदनगर 4556 जळगाव 4283 <strong>10 ऑगस्टची आकडेवारी</strong> अॅक्टिव्ह रुग्ण - 1,47,735 24 तासांतली वाढ - 9,181 बरे झालेले रुग्ण - 3,58,421 एकूण मृत्यू -18050 एकूण रुग्ण - 524513
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या