जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोरोनाची भीती असताना कोल्हापूरमध्ये समोर आली धक्कादायक घटना

कोरोनाची भीती असताना कोल्हापूरमध्ये समोर आली धक्कादायक घटना

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्यात येत असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोल्हापूर, 25 एप्रिल : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्यात येत असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गडहिंग्लज शहरातल्या सिनेमागृहात चक्क जुगार अड्डा सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी छापा टाकून 13 जणांना अटक केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरातल्या सुभाष या चित्रपटगृहात तीन पाणी जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. यामध्ये या चित्रपटगृहाचे मालक, चालक यांच्यासह 13 जणांना अटक करण्यात आली असून 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात चित्रपटगृह बाहेरून बंद ठेवून हा जुगार अड्डा सुरू असल्याची कदाचित ही राज्यातील पहिलीच घटना असावी. पण पोलिसांच्या कारवाईने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र आधीच कोरोनाचं संकट गडद होत असताना घटलेल्या या प्रकारामुळे शहरात कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. हेही वाचा - 24 तासांत कोरोनामुळे 57 लोकांचा मृत्यू, आतापर्यंत 24,506 रुग्ण पॉझिटिव्ह कोल्हापूरमध्ये काय आहे कोरोनाची स्थिती? राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर काही दिवस कोल्हापूर शहर मात्र कोरोनापासून दूर होतं. मात्र नंतरच्या काळात कोल्हापूरमध्येही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. कोल्हापूरमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली असून आतापर्यंत 2 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 4 जण कोरोनापासून पूर्णपणे बरे झाले आहेत. संपादन - अक्षय शितोळे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात