Home /News /maharashtra /

VIDEO : 'तुम्ही सीपी असाल पण आम्ही इथले एसीपी आहोत', नांगरे-पाटलांना असे मिळाले आदेश

VIDEO : 'तुम्ही सीपी असाल पण आम्ही इथले एसीपी आहोत', नांगरे-पाटलांना असे मिळाले आदेश

नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना नियम पाळायला भाग पाडलं आहे.

    नाशिक, 17 एप्रिल : कोरोना व्हायरसचा संसर्ग राज्यात वाढत आहे. डॉक्टर आणि पोलीस अहोरात्र कोरोनाविरुद्ध लढाईत अग्रस्थानी येऊन लढत आहेत. नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अनेक ऑर्डर्स दिल्या आहेत पण त्यांना थेट समोर उभं राहून ऑर्डर दिल्या आणि त्याचं पालनही करावं लागलं आहे. 'तुम्ही एसपी असला पण आम्ही इथे एसीपी आहोत.' असं म्हणत नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना नियम पाळायला भाग पाडलं आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यात नाशिक जिल्ह्याधिकाऱ्यांनी एक खास विशेष मोहीम राबवली आहे. विश्वास नांगरे पाटील आपल्या ट्वीटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हे वाचा-रतन टाटा यांना 'भारतरत्न' द्या, सोशल मीडियावर ऑनलाईन याचिकेला लाखोंचा पाठिंबा या व्हिडीओमध्ये त्यांची दोन मुलं घराबाहेर दारात उभी आहेत. जान्हवी आणि रणवीर हे आपल्या वडिलांना सांगत आहेत. तुम्ही सीपी असाल आम्ही एसीपी आहोत. त्यामुळे आमचं ऐका आधी फोन सॅनिटाइझ करा, हात सॅनिटाइझ करा. अशा ऑर्डर्स त्यांची मुलं देत आहेत. वडील आणि मुलांमधील हा गमतीशीर पण जगजागृती करणारा संवाद पोलीस आयुक्त विश्वास नांगरी पाटील यांनी ट्वीट केला आहे. हे वाचा-COVID-19 : बँक, कृषि क्षेत्र आणि सामान्य नागरिकांसाठी RBIचे महत्त्वाचे निर्णय संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Nashik, Vishwas nangare patil

    पुढील बातम्या