मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

दिलासादायक बातमी, महाराष्ट्रातील आणखीन एक जिल्हा कोरोनामुक्तच्या दिशेनं

दिलासादायक बातमी, महाराष्ट्रातील आणखीन एक जिल्हा कोरोनामुक्तच्या दिशेनं

6 महिन्यांच्या बाळावर उपचार सुरू होते. या उपचारानंतर काल त्याची पुन्हा तपासणी करण्यात आल्यानंतर अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

6 महिन्यांच्या बाळावर उपचार सुरू होते. या उपचारानंतर काल त्याची पुन्हा तपासणी करण्यात आल्यानंतर अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

6 महिन्यांच्या बाळावर उपचार सुरू होते. या उपचारानंतर काल त्याची पुन्हा तपासणी करण्यात आल्यानंतर अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

  • Published by:  Kranti Kanetkar

रत्नागिरी, 24 एप्रिल : राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 हजारच्या टप्प्यात असला तरीही दिलासा देणारी बातमी आहे. महाराष्ट्रातील आणखीन एक जिल्ह्या कोरोनामुक्तच्या उंबरठ्यावर आहे. रत्नागिरी तालुक्यात 6 महिन्यांच्या चिमुकल्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. रत्नागिरीमध्ये 6 कोरोनाचे रुग्ण आढळले होते. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. 6 महिन्यांच्या बाळावर उपचार सुरू होते. या उपचारानंतर काल त्याची पुन्हा तपासणी करण्यात आल्यानंतर अहवाल निगेटिव्ह आले आहेत. साखरतर इथल्या 2 महिलांचे अहवाल या आधी निगेटिव्ह आले होते. जिल्ह्या प्रशासनानं केलेल्या चाचण्यांमध्ये 16 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे आता जिल्हा प्रशासनानं सुटकेचा निश्वास टाकला आहे.महाराष्ट्रात कोरोनाबाधितांमध्ये झापट्याने वाढ होत आहे. त्याबरोबर मृतांची संख्याही कमी होत नाही आहे. राज्यात गुरुवारी कोरोनाने 14 रुग्णांचा बळी घेतला आहे. तर 778 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 6427 झाली आहे. तर राज्यात आजपर्यंत एकूण 840 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

हे वाचा-कोरोनाचं थैमान सुरू असताना कोसळलं आस्मानी संकट; या शहरात रस्त्याची झाली गुहा

देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वेगानं वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत एक हजार 684 कोरोनाच्या नव्या केसेस समोर आल्या आहेत. तर देशभरात 37 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा देशभरात आकडा 23 हजारवर पोहोचला आहे. त्यापैकी 17 हजार 610 जणांवर देशभरात उपचार सुरू आहेत. दिलासा देणारी बाब म्हणजे 4 हजार 749 रुग्ण बरे झाले असून त्यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून घरी सोडलं आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

हे वाचा-VIDEO : जीव धोक्यात घालून कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टरांचे आमदाराने धरले पाय

संपादन- क्रांती कानेटकर

First published:

Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Ratnagiri