एकीकडे कोरोना विरुद्ध देशभरात आणि कर्नाटकात लढा देत असताना अवकाळी पावसाचं संकट नागरिकांवर कोसळलं आहे.
बंगळुरू इथे अनेक भागांमध्ये गुरुवारी तुफान पाऊस झाला. वादळीवाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली होती.
या रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या गाड्याही खाली पडल्या आहेत. अवकाळी आलेल्या पावसानं अडचणीत आणखीन भर पडली आहे.
पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली. रस्त्यावर पूर आला होता. त्याचबरोबर या अवकाळी पावसाने शेतकरीही अस्वस्थ झाले आहेत.