जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / AC मुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका? पाहा काय म्हणाले आरोग्यमंत्री

AC मुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका? पाहा काय म्हणाले आरोग्यमंत्री

AC मुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका? पाहा काय म्हणाले आरोग्यमंत्री

कोरोनाचे विषाणू हे थंड हवेत किंवा गारठा असेल तिथे जास्त काळ जिवंत राहतात त्यामुळे हे विषाणू अशा वातावरणात वेगानं पसरण्याचा धोका सर्वाधिक असतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 मार्च : महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढत असल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे. आज आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 63 झाल्याची माहिती दिली. हा धोका टाळण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. असं असतानाही संसर्गातून जवळपास 12 ते 14 जणांना लागण झाल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे. परिस्थिती अशीच कायम राहिल्यास चिंतेची बाब आहे. महाराष्ट्रातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 52 वरुन 63 वर पोहोचली आहे. मुंबईत 10 नवीन रुग्ण आढळले आहे. तर एक जण पुण्यात आढळला आहे. मुंबईत विदेशातून आलेले 8 रूग्ण तर संसर्गातून तिघांना लागण झाली आहे. त्यामुळे राज्यात 11 रुग्णांची वाढ झाली आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली. आतापर्यंत आढळलेल्या 63 रुग्णांपैकी 12 ते 14 जणांना संर्गातून कोरोनाची लागण झाली आहे तर उर्वरित कोरोनाबाधित हे परदेशातून आले आहेत, असंही त्यांनी सांगितलं. हे वाचा- संतापजनक! हातावर स्टॅम्प मारल्यानंतरही कुलगुरूंनी केला मुंबई-पुणे प्रवास कोरोनाचे विषाणू हे थंड हवेत किंवा गारठा असेल तिथे जास्त काळ जिवंत राहतात त्यामुळे हे विषाणू अशा वातावरणात वेगानं पसरण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे एसीचा वापर कमी करावा. घरीही शक्यतो दारं खिडक्या उघडे ठेवावेत. शक्यतो पंख्याचा वापर करावा. उन्हामध्ये विषाणूची ताकद कमी होते त्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका कमी असतो. त्यामुळे घरात सूर्यप्रकार येऊ द्यावा. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातही एसीचं कुलिंग कमी ठेवण्याबाबत परिपत्रक काढण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला म्हणजे येत्या रविवारी ‘जनता कर्फ्यु’चं आवाहन केलं. लोकांनी सकाळी 7 ते रात्री पर्यंत घराबाहेर निघू नये असे पंतप्रधानांनी सांगितले. त्याअंतर्गत शनिवारी मध्यरात्री ते रविवार रात्री दहा वाजेपर्यंत अनेक सेवा बंद राहणार आहेत. हे वाचा- डोळ्यांदेखत मृत्यू पाहिला पण…, कोरोनावर मात केलेल्या रुग्णाची डायरी आली समोर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात