मुंबई, 5 मार्च : कोरोना व्हायरसच्या भीतीने बायोमेट्रिक हजेरी बंद करण्याचा निर्णय महावितरणकडून घेण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणच्या मुख्य कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी बंद करण्यात आली. त्यामुळे यापुढे कर्मचाऱ्यांची हजेरी पाटावर हजेरी लावली जाणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही व्यवस्था करण्यात आली आहे. दुसरीकडे, कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता सैन्यानेही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मार्गदर्शन सूचनांप्रमाणे सैन्याच्या सर्व वस्तूंचे अनुसरण करण्यास सांगिण्यात आले आहे. याबाबत लष्कराला प्रथम 24 जानेवारीला सल्ला देण्यात आला होता . त्यानंतर 28 जानेवारी आणि 31 जानेवारीला सल्ला देण्यात आला. लष्करी स्टेशनवर सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना करोना विषाणूचा सामना करण्यासाठी जागरूक करावे असं सांगण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेला सल्ला पहिल्यांदा आदेश रूपाने पाठविला गेला आहे. दरम्यान, जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रात शिरकाव होऊ नये, यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. ‘पुढचे 15 दिवस काळजी घ्या. मास्क लावून फिरण्याचं काही कारण नाही. केवळ डॉक्टर आणि तपासणी करणारे अधिकारी यांना मास्कची गरज आहे. राज्यात मुंबई, पुणे आणि नागपूर इथं कोरोनाबाबत तपासणीसाठी केंद्र सुरू करण्यात आलं आहे,’ अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ‘होळीच्या उत्सवात अनावश्यक गर्दी टाळा. ताप , अंगदुखी, कफ ही प्राथमिक लक्षणे आहेत. डायबिटीस, प्रतिकार शक्ती कमी असेल तर त्यांनी काळजी घ्यावी. एन 95 मास्क लावण्याची आवश्यकता नाही. हात धुणे अत्यंत महत्वाचे आहे. हात धुण्यासाठी साबण नसेल तरी चालेल, स्वछ पाण्याने हात धुवा,’ असं आवाहन कोरोनो व्हायरसच्या धोक्याबाबत माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषद उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. हेही वाचा- मराठी मालिका आणि ब्राह्मण अभिनेत्री… वादात आता संभाजी ब्रिगेडनेही घेतली उडी दरम्यन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेतही ‘कोरोना’वर निवेदन दिलं आहे. कोरोनाला न घाबरता संकटाचा सामना करा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. राज्यात भीतीचं वातावरण नसल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. तर मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणात याबाबत काळजी घेतली जात असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. कोरोनामुळे भयभीत न होता संकटाचा मुकाबला केला पाहिजे. भयभीत झाल्याने चुका होतात असंही ते म्हणाले. दरम्यान कोरोनाशी दोन हात करण्यासाठी होळी मर्यादेतच खेळा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







